नागपूर-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांच्या वडिलांचाही अवमानकारक उल्लेख करणाऱ्या शिवसेनेवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. ‘शिवसेनेच्या या वर्तनाला महाराष्ट्राची जनताच उत्तर देईल,’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे.तर नरेंद्र मोदींचा अपमान कदापि सहन करणार नाही असा इशारा भाजप नेते नितीन गडकरी यांनी हि दिला आहे
भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या फडणवीस यांनी बुधवारी सकाळी नागपुरात मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. ‘कोणावरही व्यक्तिगत हल्ले करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भारताच्या पंतप्रधानांच्या वडिलांचा अनादरपूर्वक उल्लेख करणे हे अयोग्यच आहे. शिवसेनेच्या या उद्योगांना भाजपने उत्तर देण्याचे गरज नाही, जनताच त्यांना काय द्यायचे ते उत्तर देईल,’ असे फडणवीस म्हणाले. ‘महाराष्ट्रात भाजपचेच सरकार पूर्ण बहुमताने येईल,’ असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.दरम्यान ‘नरेंद्र मोदींचा अपमान कदापि सहन करणार नाही. भाजप हा लाचारांचा पक्ष नाही. तुम्हाला आमचा सन्मान करणे जमत नसेल तर अपमान तरी करू नका,’ अशा शब्दांत भाजप नेते नितीन गडकरी यांनी शिवसेनेला सुनावले आहे.
मोदींचा अवमान सहन करणार नाही – फडणवीस ; गडकरी
Date: