पुणे- जिल्हा माळी वधु वर सूचक मंडळातर्फे माळी समाजाचा भव्य वधु वर मेळावा उत्साहात संपन्न झाला . पर्वतीजवळील अरण्येशवर मधील मुक्तागन कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यामध्ये २९६ वधु तर २३१ वरांनी सहभागी होऊन आपला परिचय करून दिला . या मेळाव्याचे उदघाटन संत सावतामाळी यांच्या प्रतिमेस पुष्पहार उपस्थित वधु वरांच्या हस्ते अर्पण करून त्यांच्या पूजनाने करण्यांत आले . यावेळी पुणे जिल्हा माळी वधु वर सूचक मंडळाचे समन्वयक राम झगडे , सुदाम धाडगे , नाना कुदळे , रघुनाथ ढोक , शारदा लडकत , शिवाजीराव लोणकर , मालती माळी , उज्वला कांडपिळे , शंकुतला झगडे , कारभारी टिळेकर , चंद्रकांत जगताप , सिताराम गोरे व अन्य सदस्यांनी विशेष परिश्रम घेऊन मेळावा यशस्वीरीत्या पार पाडला .
या मेळाव्यामध्ये राज्यभरातून माळी समाजातील वधु वरांनी सहभागी होऊन आपला परिचय करून दिला . या मेळाव्याचे सूत्रसंचालन संजय गिते व शीतल आल्हाट यांनी केले तर आभार महेश जांभुळकर यांनी मानले . या मेळाव्यानंतर सहभागी झालेल्या वधु वरांची माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा माळी वधु वर सूचक मंडळाचे समन्वयक राम झगडे यांनी दिली .