पाटणा -माझा मुलगा निवडणूक लढणार नाही तर काय करणार; म्हशी चारणार, असा सवाल करीत ‘तेजप्रतापच नव्हे तर धाकटा पोरगा तेजस्वी आणि मुलगी मीसा यादव हीसुद्धा विधानसभा लढेल,’ असंही राष्ट्रीय जनता दलाचे नेते व बिहारचे दिग्गज नेते लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रीय जनता दलाच्या १९व्या वर्धापनदिनानिमित्त वैशाली येथे झालेल्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात लालूंचा मुलगा तेजप्रताप यादव याने महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. महुआ विधानसभा मतदारसंघात आरजेडीचे यापूर्वीचे उमेदवार असलेले जागेश्वर राय हे तेजप्रतापच्या घोषणेमुळं काहीसे नाराज आहेत . राय यांनीही मग लगेचच लालूप्रसाद यांनी आदेश दिला तरच आपण पुढची निवडणूक लढू, असं उपरोधिकपणं तिथंच सांगून टाकलं. त्यामुळं राय यांच्या समर्थकांनी सभेत जोरदार घोषणाबाजी व गदारोळ सुरू केला. त्यावर स्वत: लालू यांनी सभेचा ताबा घेतला आणि तेजप्रताप निवडणूक लढेल असं सांगून टाकलं. ‘आमचं कुटुंब निवडणुकीच्या राजकारणाला अपवाद नाही. माझा मुलगा निवडणूक लढणार नाही तर काय करणार; म्हशी चारणार, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. ‘तेजप्रतापच नव्हे तर धाकटा पोरगा तेजस्वी आणि मुलगी मीसा यादव हीसुद्धा विधानसभा लढेल,’ असंही लालूंनी स्पष्ट केलं.
माझी मुले निवडणूक नाही लढणार तर काय म्हशी चारणार ? लालूंचा चा सवाल
Date: