पुणे – पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या पाच गणपती मंडळांनी यंदाच्या वर्षी त्यांच्या “श्रीं‘च्या मूर्तींचे विसर्जन हौदातील पाण्यामध्ये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी जाहीर केला. परंपरा मोडून मानाच्या मंडळांनी घेतलेल्या या “स्मार्ट‘ निर्णयाचे स्वागत करीत, श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व अखिल मंडई मंडळांनी पाठिंबा दर्शविला आहे. अन्य मंडळांनी व नागरिकांनीदेखील “श्रीं‘च्या मूर्तीचे विसर्जन हौदातील स्वच्छ पाण्यामध्ये करावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान सुमारे तीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करून प्रथमच निमलष्करी दल आणि फोर्स वनच्या जवानांना बंदोबस्तात सहभागी करून घेतले आहे आणि पोलिस दल सज्ज झाले आहे अशी माहिती विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली.
महापौर दत्तात्रेय धनकवडे यांच्यासह मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ टिकार, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विवेक खटावकर, कोशाध्यक्ष नितीन पंडित, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या मंडळांच्या “श्रीं‘चे विसर्जन हौदातील पाण्यात करण्याच्या निर्णयाची माहिती दिली. निर्णय जाहीर केल्यानंतर महापौर धनकवडे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या कसबा गणपतींची आरती करण्यात आली. मानाचा पाचवा केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त रोहित टिळक, श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष बाबा डफळ यांनीही या निर्णयास पाठिंबा दर्शविला आहे.

शेटे म्हणाले, “”हिंदू शास्त्रानुसार मूर्तीचे विसर्जन जलतत्त्वात व्हावे, असे म्हटले आहे. त्यामुळे आमचा हा निर्णय धर्मशास्त्राच्या विरोधात नाही. प्रथा, परंपरा आणि समाज यांनी या निर्णयाकडे कसे पाहावे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. त्यामुळेच हिंदुत्ववाद्यांनी या निर्णयास पाठिंबा द्यावा. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही मंडळांच्या या स्तुत्य निर्णयाचे कौतुक केले आहे.‘‘
गणेश विसर्जनाची मिरवणूक उत्साहात आणि निर्विघ्नपणे व्हावी, यासाठी शहर पोलिस सज्ज झाले आहेत. यंदाच्या मिरवणुकीत बंदोबस्तासाठी प्रथमच निमलष्करी दल आणि फोर्स वनच्या जवानांचा सहभाग राहणार आहे. तसेच, प्रमुख मार्गांवरील 37 ठिकाणी 56 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, सुमारे तीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केल्याची माहिती विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली.
शहरातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, कर्वे रस्ता, लष्कर विभाग, पिंपरी विभाग, खडकी आणि दत्तवाडी विभागातून मुख्य विसर्जन मिरवणूक जाणार आहे. या मिरवणुकीत बंदोबस्तासाठी पोलिस आयुक्त, सहआयुक्त यांच्यासह तीन अतिरिक्त आयुक्त, 14 उपायुक्त, 40 सहायक आयुक्त, 55 पोलिस निरीक्षक, 262 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, अडीच हजार पोलिस कर्मचारी आणि अडीचशे होमगार्ड बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. तसेच, निमलष्करी दलाची (बीएएसएफ) तीन पथके, फोर्स वन, रॅपिड ऍक्शन फोर्स, राज्य राखीव पोलिसांची (एसआरपीएफ) प्रत्येकी एक तुकडी, बॉंब शोधक व नाशकची (बीडीडीएस) सहा पथके, दंगल नियंत्रण पथक आणि शीघ्र कृती दलाचे (क्यूआरटी) जवान तैनात राहतील. शहरातील 90 संवेदनशील ठिकाणी, विसर्जन घाट आणि परतीच्या मिरवणुकीचा बंदोबस्त नेमला आहे. तसेच, नागरिकांसाठी मदत केंद्रे, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रमुख मिरवणूक मार्गांवरील रस्ते टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर विसर्जन मिरवणुकीवर राहणार आहे. त्यासाठी पोलिस आयुक्तालय आणि फरासखाना पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्ष राहणार आहे. संशयितांच्या हालचाली टिपण्यासाठी 11 ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आल्याचे पाठक यांनी सांगितले.

सूर्यवंशी म्हणाले, “”पुण्यात नऊ लाखांहून अधिक घरगुती गणपतींचे; तर सुमारे साडेचार हजार मंडळांच्या “श्रीं‘च्या मूर्तींचे विसर्जन होते. मानाच्या मंडळांचा निर्णय सकारात्मक आहे. हा निर्णय जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून अन्य मंडळांनाही कळविण्यात येईल.‘‘