सालाबादप्रमाणे यंदाच्याकारशी देखील भगत कुटुंबियाच्यावतीने तुळजाभवानी मातेचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . पुणे लष्कर भागातील महात्मा गांधी रोडवरील तिळवण तेली समाज कार्यालयात हा कार्यक्रम झाला . यावेळी तुळजाभवानी मातेची पूजा करण्यात येउन आरती करण्यात आली , त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .
भगत कुटुंबियाच्यावतीने तुळजाभवानी मातेला दसरा आणि कोजागिरी पौर्णिमेला पालखी आणण्याचे काम भगत कुटुंबीय करीत असतात , त्यावेळी आरादी लोक (परडी घेणारे आणि पोत घेणारे) यांच्यातर्फे भगत कुटुंबियांना मान देतात त्यावेळी आरादी लोक परडीत जोगवा जमा करतात , तो मिळालेला जोगवा प्रसाद स्वरुपात पुण्यात सर्व देवी भक्तांना दिला जातो . त्यानिमित भगत कुटुंबियाच्यावतीने तुळजाभवानी मातेचा महाप्रसादाचे आयोजन केले जाते . अशी माहिती दिनेश भगत यांनी दिली .
यावेळी जगदीश भगत , रामकृष्ण भगत , उमेश भगत , अरविंद भगत , सचिन भगत , जयंत भगत , जितेंद्र भगत , योगेश भगत , आदित्य भगत , अक्षय भगत , आनंद भगत , प्रकाश भगत , पंकज भगत , घनश्याम भगत , निरज भगत , तिळवण तेली समाजातील विश्वस्त मंडळी आणि भगत कुटुंबिय उपस्थित होते .
यावेळी नगरसेवक उदयकांत आंदेकर , प्रसाद केदारी , दिलीप गिरमकर , माउली व्हावळ , राजेंद्र गिरमकर आदी मान्यवर उपस्थित होते .