पुणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १०० स्मार्ट सिटीच्या ध्येयामध्ये पुण्याचाही सहभाग व्हावा या उद्देशाने चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अॅण्ड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए), कॉनफेडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स ऑफ पुणे (क्रेडाई) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या पुढाकाराने स्मार्ट सिटी संवाद ही वेबपोर्टल तयार करण्यात आले. जनतेशी संवाद साधण्यासाठी तसेच त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी स्मार्ट सिटी संवाद या वेबसाईटचे आज खा.अनिल शिरोळे यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार,पुणे विद्यापीठाचे डॉ. करमरकर, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया उपस्थित होते. www.smartcitysamvad.org या वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध असणार आहे.
महाराष्ट्र सरकारला यासाठी १० शहरांची नामांकन द्यावयाची आहेत. त्यातूनच मग पुढे राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येतील मग यातील विजेत्यांचा सहभाग पुढे देश पातळीवरील स्पर्धेसाठी होणार आहे. आपल्या शहराच्या प्रगतीसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेने या उद्देशात सहभागी होण्यासाठी या साईटची निर्मिती केली असून त्याद्वारे लोकांच्या सूचनांना आणि विचारांना लक्ष्यात घेऊन त्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या महानगरपालिकांना नियमित स्वरुपात दिल्या जाणार आहेत.
खा. अनिल शिरोळे यांनी अशा पद्धतीचा पुढाकार घेतल्याबद्दल अभिनंदन केले व म्हणाले सरकारचा असा मनोदय आहे कि स्मार्ट सिटी हि कागदी योजना न राहता चळवळ बनावी. या पुढाकारामुळे हि चळवळ प्रभावशाली होईल. पुण्याची ओळख स्मार्ट सिटी म्हणून व्हावी यासाठी लोकांनी जास्तीत जास्त सक्रियतेने सहभाग घ्यावा.
स्मार्ट सिटीच्या या प्रकल्पासाठी पुण्याचे काम कौतुकास्पद असल्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली असल्याचे मत पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केले. तसेच पुण्याची स्मार्ट सिटी म्हणून प्रतिमा तयार करण्याचे प्रयत्न राष्ट्रीय स्तरावर इतरांसाठी आदर्श ठेवण्यासारखे आहेत असेही ते म्हणाले.
कटारिया पुढे म्हणाले, स्मार्ट सिटीबद्दलच्या आमच्या कल्पना काय आहे त्यावर नागरिकांनी आपले विचार, सूचना तसेच मते आमच्या पर्यंत पोहोचवावे. त्यातील विशेष सूचना सरकार पर्यंत पोहोचवण्यात येतील व त्याची दखल घेतल्याचे कळवण्यात येईल
या वेबसाईटवर स्मार्ट सिटीबद्दलच्या संकल्पना काय आहे,त्यावर आधारित ताज्या घडामोडींविषयीची माहिती,त्याविषयी तज्ञानांचे मत आणि विचार यासर्व गोष्टी वेबसाईटवर असणार आहेत अशी माहिती सीएमडी पोझीव्ह्यूव चे नॉलेज पार्टनर सी. ए. विनीत देव यांनी दिली.
