पुणे- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड वतीने श्रमिक साहित्यिक कवी बादशहा सय्यद यांचा सन्मानचिन्ह , अकरा हजार रोख , शाल आणि पुष्पगुछ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते दलित चळवळीतील ” श्रमिक साहित्यिक पुरस्कार ” देण्यात आला . सातारा रोड वरील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला . यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड अध्यक्ष महेश शिंदे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे , झुबेर शेख , माजी नगरसेवक नवनाथ कांबळे , एम. डी. शेवाळे , परशुराम वाडेकर , अशोक शिरोळे , बाळासाहेब जानराव , आदिल सय्यद , रफिक दफेदार , झुबेर शेख , हनुमंत साठे, फैय्याज शेख लतिका साठे , सुन्नाबी शेख आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते .
साहित्यिक कवी बादशहा सय्यद हे आंबेडकर चळवळीत गेली तीस वर्षापासून काम करीत आहे , दलित चळवळीत दलित पेन्थर पासून काम करीत आहे . दलित रंगभूमी , बुकोई , वतन सुरक्षा , रिक्षा युनियन , सामाजिक संस्थेवर त्यांनी भरीव कार्य केले आहे . सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न , अभ्यासू वृतीने त्यांनी सोडविले आहेत . त्यांनी सुचल्या कविता संग्रह प्रकाशित केला आहे तसेच , सावधान राजकारण चालू आहे आणि घटना बचाव आदी पुस्तकांचे त्यांनी लिखाण केले आहे .