विद्यार्थ्यांनी कलागुणांना हिर्यासारखे चमकवावे : डॉ.सचिन वेर्णेकर
पुणे :
‘चॉईस, चान्स, चेंज हे तीन ‘सी’ आयुष्यात अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे त्याचे महत्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना हिर्यासारखे चमकवावे. हे कला गुण पुढे आणण्यासाठी आयएमईडी गेम्स महोत्सवासारख्या स्पर्धा महोत्सवाचा विद्यार्थ्यांना चांगला उपयोग होतो.’ असे प्रतिपादन डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ व्यवस्थापन शास्त्रशाखेचे अधिष्ठाता आणि ‘आय एम ई डी’चे संचालक) यांनी केले.
ते ‘भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’(आयएमईडी) मध्ये ‘आयएमईडी गेम्स्’ या स्पर्धा महोत्सवाच्या पारितोषिक वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. आयएमईडीमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळणे या प्रमुख हेतूने आयएमईडी गेम्स महोत्सवाचे आयोजन दरवर्षी आयएमईडीमध्ये करण्यात येते. डॉ.सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी डॉ. अजीत मोरे, डॉ. प्रविण माने, डॉ. सचिन वेर्णेकर, डॉ. रणप्रीत कौर, डॉ. भारतभूषण सांक्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवाला ‘ग्लोबल टेक्नॉलॉजी’चे उपाध्यक्ष अभय जहीराबादकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. प्रविण माने, बलजित कौर, प्रभात कुमार यांनी या महोत्सवाचे संयोजन केले होते.
या महोत्सवातील स्पर्धांमधील वक्तृत्व स्पर्धेत गार्गी घोष (प्रथम), अॅड मॅड शो स्पर्धेत ईशा चावला आणि अक्षता हेलन (विभागून प्रथम), डेव्हलपिंग वेबसाईट स्पर्धेमध्ये विक्रम आणि सौरव (विभागून प्रथम), टेक्नो इव्हेंट (ASPHALT 8) स्पर्धेमध्ये राहूल धानुका (प्रथम), टेक्नो इव्हेंट प्रोगॅ्रमिंग स्पर्धेत प्रदीप कुमार आणि नीरज कुमार (विभागून प्रथम), मुक्त निर्मिती क्षमता स्पर्धेत अंजली आणि वैशाली, माझे चित्र माझी गोष्ट स्पर्धेत कौशिक ओसवाल (प्रथम), सर्वोत्तम उद्योजक स्पर्धेत स्मृती शंकर, उत्तम व्यवस्थापक बिहजाद, फ्लेमलेस कुकींग स्पर्धेमध्ये स्वीटसी आणि अनन्या (विभागून प्रथम) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.