पुणे : शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील 16 शहरांतील वीजयंत्रणेचे
सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील 233 कोटी 66 लाख रुपयांचा विविध
कामांचा आराखडा मंजूर झाला आहे.
केंद्ग शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजने अंतर्गत (Integrated Power
Development Scheme) पुणे जिल्ह्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी,
जुन्नर, दौंड, सासवड, जेजुरी, भोर, बारामती, शिरुर, इंदापूर तसेच खडकी, देहू रोड व पुणे कन्टोंनमेंट बोर्ड या 16 शहरांची
निवड करण्यात आली आहे. या शहरांत वीज वितरण यंत्रणेचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण व क्षमता विस्तार करणे,
वीजहानी कमी करणे, योग्य दाबाने व 24×7 वीजपुरवठा करण्यासाठी 233 कोटी 66 लाख रुपये खर्चाच्या विविध कामांचा
आराखडा मंजूर झाला आहे.
एकात्मिक उर्जा विकास योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील या 16 शहरांत 9 नवीन 22/11 केव्ही क्षमतेचे उपकेंद्ग,
22/11 केव्ही क्षमतेच्या 27 उपकेंद्गाचे आधुनिकीकरण, 156 किलोमीटर नवीन 22 केव्ही वाहिन्या व वाहिन्यांचे विभाजन,
35 किलोमीटर 22 केव्ही वाहिनीची क्षमतावाढ, 32 किलोमीटर एरियल बंच केबल, 68 किलोमीटर लघुदाब वाहिन्या, 85
किलोमीटर 11 केव्ही नवीन वाहिनी व वाहिनीचे विभाजन व क्षमतावाढ, 310 नवीन वितरण रोहित्रे, 259 किलोमीटरच्या
भूमिगत वाहिन्या, 7 किलोमीटर 22 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्ग वाहिनी बे वाढविणे, 1208 नवीन लघु व उच्चदाबाचे फिडर पिलर तसेच फिडर पिलरमधून वीजजोडण्या, नवीन वीजमीटर, रोहित्रांचे व वाहिन्यांचे वीजखांब बदलणे आदी कामे
करण्यात येणार आहेत