पुणे :
‘भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) च्या ‘कॉम्प्युटर अॅप्लिकेशन अॅण्ड सिस्टीम स्टडिज्’ विभागाच्या वतीने आयोजित ‘सी-गुगली-2015’ स्पर्धेची सांगता झाली. ही स्पर्धा आयएमईडी कॅम्पस, पौैड रोड येथे नुकतीच झाली. ही स्पर्धा आंतरमहाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये पदवीचे शिक्षण घेणारे व पदव्युत्तर विद्यार्थि सहभागी झाले होते.
भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर आणि धनंजय गोखले working as a CATALYST in the field of project management ) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
प्रा. सत्यवान हेंबाडे, सुजाता मुळीक यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. डॉ. अजित मोरे, प्रा. आर.व्हि.महाडीक, प्रा.एस.जोगळेकर, प्रा. पी. पवार, डॉ. एन. एन. महाजन, डॉ. एच. पाडळीकर आदी उपस्थित होते.
‘सी-गुगली-2015’ मध्ये डिव्हाईस एकत्र करणे, एसक्युएल लोडस्टर, डीए वीन-सी-कोड, लॅन गेमिंग (एनएफएस), प्रकल्प सादरीकरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
‘आयएमईडी’च्या वतीने आयोजित ‘सी-गुगली 2015’ स्पर्धेची सांगता
Date: