महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? 2016 नामांकनांची घोषणा..

Date:

मतदान कौल प्रक्रिया १५ ऑक्टोबरपासून सुरु…

मुंबई -‘नटसम्राट’, ‘सैराट’, ‘कट्यार काळजात घुसली’,  ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘दगडी चाळ’, आणि ‘पोश्टर गर्ल’ या चित्रपटांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट वर्गात नामांकनात समावेश झाला असून झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण२०१६  या पुरस्कार सोहळ्यात यापैकी एका चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळणार आहे .

नामांकने

सर्वोत्कृष्ट चित्रपट – ‘सैराट’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘दगडी चाळ’, ‘पोश्टर गर्ल’

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुबोध भावे (‘कट्यार काळजात घुसली’),महेश मांजरेकर(‘नटसम्राट’), नागराज मंजुळे(‘सैराट’), चंद्रकांत कणसे(‘दगडी चाळ’), सतीश राजवाडे (‘मुंबई पुणे मुंबई २’), समीर पाटील(‘पोश्टर गर्ल’)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – सुबोध भावे (‘कट्यार काळजात घुसली’), नाना पाटेकर (‘नटसम्राट’), आकाश ठोसर(‘सैराट’), अकुंश चौधरी (‘दगडी चाळ’), स्वप्नील जोशी(‘मुंबई पुणे मुंबई २’)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अमृता खानविलकर(‘कट्यार काळजात घुसली’), मृण्मयी देशपांडे(‘कट्यार काळजात घुसली’),रिंकू राजगुरू(‘सैराट’), मुक्ता बर्वे (‘मुंबई पुणे मुंबई २’), मेधा मांजरेकर(‘नटसम्राट’),सोनाली कुलकर्णी (‘पोश्टर गर्ल’)

पॉप्युलर फेस ऑफ द इयर– रिंकू राजगुरू, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, सई ताम्हणकर, स्पृहा जोशी,

सर्वोत्कृष्ट स्टाईल आयकॉन – आकाश ठोसर, स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, सिद्धार्थ चांदेकर

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता –  प्रशांत दामले (‘मुंबई पुणे मुंबई २’), विक्रम गोखले (‘नटसम्राट’), जितेंद्र जोशी(‘पोश्टर गर्ल’), मकरंद देशपांडे (‘दगडी चाळ’), तानाजी गालगुंडे(‘सैराट’),

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – मृण्मयी देशपांडे(‘नटसम्राट’), नेहा पेंडसे(‘नटसम्राट’), आसावरी जोशी (‘मुंबई पुणे मुंबई २’), साक्षी तन्वर (‘कट्यार काळजात घुसली’), छाया कदम(‘सैराट’)

सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता – अमितरियान पाटील (‘राजवाडे अॅण्ड सन्स’), आकाश ठोसर (‘सैराट’),अक्षय टांकसाळे (‘वाय झेड’)

सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री – ‘रिंकू राजगुरू’ (‘सैराट’), मिताली मयेकर (उर्फी), कृतिका देव (‘राजवाडे अॅण्ड सन्स’)

सर्वोत्कृष्ट खलनायक – सूरज पवार (‘सैराट’), सचिन पिळगांवकर (‘कट्यार काळजात घुसली’), संजय खापरे (‘दगडी चाळ’), सुरेश विश्वकर्मा (‘सैराट’)

सर्वोत्कृष्ट गायक – अजय गोगावले ‘याड लागलं’ (‘सैराट’), अजय गोगावले ‘सैराट झालं जी’ (‘सैराट’), अजय गोगावले ‘झिंग झिंग झिंगाट’(‘सैराट’), शंकर महादेवन ‘सूर निरागस हो’ (‘कट्यार काळजात घुसली’), आनंद शिंदे, आदर्श शिंदे ‘आवाज वाढव डीजे’ (‘पोश्टर गर्ल’), महेश काळे ‘अरुणी किरणी’(‘कट्यार काळजात घुसली’)

सर्वोत्कृष्ट गायिका – श्रेया घोषाल ‘आता बया का बावरलं’(‘सैराट’), चिन्मयी श्रीपाद ‘सैराट झालं जी’ (‘सैराट’), आनंदी जोशी ‘सूर निरागस हो’ (‘कट्यार काळजात घुसली’), बेला शेंडे ‘साथ दे तू मला’(‘मुंबई पुणे मुंबई २’), आनंदी जोशी, बेला शेंडे ‘बॅण्ड बाजा वरात’ (‘मुंबई पुणे मुंबई २’), आनंदी जोशी ‘धागा धागा’ (‘दगडी चाळ’),

सर्वोत्कृष्ट गीत – ‘याड लागलं’ (‘सैराट’), सैराट झालं जी (‘सैराट’), ‘झिंग झिंग झिंगाट’(‘सैराट’), ‘आता बया का बावरलं’(‘सैराट’),‘सूर निरागस हो’ (‘कट्यार काळजात घुसली’), ‘आवाज वाढव डीजे’ (‘पोश्टर गर्ल’)

. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?. या पुरस्कार सोहळ्यात आपल्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळावी असं सगळ्याच कलाकारांना वाटतं. चांगल्या गुणवत्तेची दखल घेत या पुरस्कार सोहळ्याने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याला आज व्यापक व भव्य स्वरूप प्राप्त झालंय. मराठी चित्रपटात सातत्याने चांगल्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. याची दखल घेत यंदाही या पुरस्कार सोहळ्यासाठी उत्तमोत्तम सिनेमांची निवड करण्यात आली आहे. आता प्रेक्षकांनासुद्धा या सिनेमांमधील सर्वोत्कृष्ट सिनेमाची निवड करायची आहे. या पुरस्कारासाठी मतदान करून प्रेक्षकांनी आपल्या आवडीच्या चित्रपटाला व कलाकाराला निवडून दयायचं आहे. झी टॅाकीजच्या या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे लकी विजेत्यांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.

आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांना आपलंसं करणाऱ्या कलावंतांना दिला गेलेला मानाचा मुजरा म्हणजे झी टॅाकीज आयोजित महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हा सन्मानसोहळा. रसिकांच्या मतांवर अवलंबून असलेल्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?२०१६ या सोहळ्याचे पडघम मनोरंजनसृष्टीत वाजू लागले असून नुकतीच पारितोषिकांसाठीची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. गेल्या सात वर्षांपासून आयोजित होत असलेल्या या सोहळ्याचे यंदा आठवे वर्ष आहे. रसिक प्रेक्षकांचा सर्वाधिक कौल मिळणाऱ्या नामांकनांमधून अंतिम विजेता घोषित होणार आहे.

झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण२०१६ पुरस्कारासाठीच्या मतदान प्रक्रियेला १५ ऑक्टोबर पासून सुरवात होणार आहे. या पुरस्काराच्या मतदानासाठी झी टॉकीज वाहिनीने दोन पर्याय उपलब्ध केले आहेत. पहिल्या पर्यायामध्ये नामांकन असलेल्यांना ‘मिस्ड् कॅाल’ देऊन प्रेक्षक आपली मतं नोंदवू शकतात. ही मतदान प्रक्रिया १५ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. दुसरा पर्याय डिजिटल मतदानाचा असून यासाठी झी टॅाकीजच्या www.zeetalkies.com/mfk  या वेबसाईटवरसुद्धा प्रेक्षकांना आपली मत नोंदवता येतील. ही मतदान प्रक्रिया १५ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. महाराष्ट्राची जनता आता कोणाला कौल देणार? या निवडणुकीत कोणाचा आवाज घुमणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत घोषित करण्यात आलेल्या नामांकनामध्ये ‘सैराट’ व ‘कट्यार काळजात घुसली’ला सर्वाधिक नामांकने मिळालीत. ‘नटसम्राट’, ‘वाय झेड’, उर्फी, ‘राजवाडे अॅण्ड सन्स’, ‘दगडी चाळ’, ‘मुंबई पुणे मुबंई २’,‘पोश्टर गर्ल’ या चित्रपटांतून कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या सर्वाधिक मतांचा कौल जिंकेल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने संचालक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी उत्तराधिकाराची घोषणा केली

पुणे-१० मार्च २६ : किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने आज जाहीर केले की कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष  अतुल किर्लोस्कर हे 70 वर्षांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्ण केल्यामुळे 31 मार्च 2026 रोजी (कार्यालयीन वेळ संपल्यानंतर) आपल्या पदावरून निवृत्त होतील. श्री. किर्लोस्कर हे गेल्या ४३ हून अधिक वर्षांपासून KOEL सोबत कार्यकारी आणि गैरकार्यकारी अशा विविध भूमिकांमध्ये कार्यरत होते. त्यांनी १९८३ मध्ये कंपनीत प्रवेश केला. नोव्हेंबर १९८४ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL (आता किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड KIL म्हणून ओळखली जाते) मध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट १९८५ मध्ये त्यांची संचालक मंडळावर सहनियुक्ती (coopted) करण्यात आली आणि त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९८८ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL चे उपाध्यक्ष (Vice Chairman) म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी हे पद जुलै १९९८ पर्यंत भूषवले. त्यानंतर त्यांची तत्कालीन KOEL च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवड झाली. वर्षानुवर्षे श्री. किर्लोस्कर यांनी कार्यकारी तसेच गैर-कार्यकारी भूमिकांमध्ये संचालक मंडळाच्या विविध समित्यांवर सेवा दिली आहे. जानेवारी २००९ मध्ये प्रस्तावित डिमर्जरनंतर श्री. किर्लोस्कर यांची KOEL च्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. हा डिमर्जर मार्च २०१० मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर त्यांनी ३१ मार्च २०१० ते २५ जानेवारी २०१२ या कालावधीत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्य केले. जानेवारी २०१२ ते मार्च २०२३ या कालावधीत श्री. किर्लोस्कर यांनी कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून काम पाहिले आणि त्यानंतर त्यांनी कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून आपली भूमिका पुढे चालू ठेवली. संचालक मंडळाने कंपनीसाठी श्री. किर्लोस्कर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक आणि आभार व्यक्त केले. कंपनीच्या उत्तराधिकार नियोजन (Succession Planning) प्रक्रियेचा एक भाग म्हणून पुढील बदल नियोजित करण्यात आले आहेत. संचालक मंडळाने कंपनीचे विद्यमान नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. राहुल किर्लोस्कर यांची चेअरपर्सन म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, संचालक मंडळाने कंपनीच्या विद्यमान मॅनेजिंग डायरेक्टर सुश्री गौरी किर्लोस्कर यांची त्यांच्या सध्याच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदाच्या जबाबदारीसह व्हाइस चेअरपर्सन म्हणूनही नियुक्ती केली आहे. श्री. अतुल किर्लोस्कर म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून KOEL च्या प्रवासाचा भाग होणे माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची बाब राहिली आहे. मागील काही वर्षांपासून आम्ही या संक्रमणावर नियोजित उत्तराधिकार म्हणून काम करत होतो. माझ्या मते, वेळेवर आणि सुयोग्य नियोजनासह केलेला उत्तराधिकार हा कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच, नवीन नेतृत्वाला त्यांच्या दृष्टीकोन आणि योजनांनुसार कंपनीला पुढे नेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणेही तितकेच आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, मी कंपनीच्या संचालक मंडळावरील आणि इतर सर्व पदांवरून पूर्णपणे पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल आणि गौरी यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. मला विश्वास आहे की KOEL ला नव्या उंचीवर नेण्यासाठी आमच्याकडे योग्य टीम आहे.” श्री. राहुल किर्लोस्कर म्हणाले, ”गेल्या अनेक वर्षांत कंपनीसाठी दिलेल्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल मी अतुल यांचे आभार मानतो. या भूमिकेत पाऊल ठेवताना, अतुल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीत झालेले उत्कृष्ट कार्य पुढे नेण्याचा माझा उद्देश आहे. कंपनीला तिच्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे नेण्यासाठी गौरी आणि व्यवस्थापन टीमसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”

14 वर्षांच्या मुलींसाठी देशव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध उपाययोजना 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत 8.73 कोटी...

ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडावाव्यात-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि.१० : ग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेवून त्या...