‘नवे पर्व, युवा सर्व’ हे ब्रीद वाक्य असलेली झी युवा ही वाहिनी आपल्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आली आहे. झी युवाने फक्त मालिकांद्वारे नव्हे तर प्रेक्षकांसोबत अनेक कार्यक्रमांद्वारे देखील एक वेगळं व घट्ट नातं निर्माण केलं आहे. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊनच वाहिनीने वेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या मालिका आणि ऑनग्राउंड इव्हेंट्सद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु आहे. प्रत्येक मंडळात दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी मुलामुलींचा उत्साह उल्लेखनीय आहे. झी युवा या वाहिनीने पहिल्यांदाच नौपाडा ठाणे येथे १५ ऑकटोबर ला ‘श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान’च्या सहकार्याने , ” झी युवा दांडिया २०१८ ‘चे आयोजन संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत केले आहे .झी युवा दांडिया मध्ये झी युवा वाहिनीवरील मालिकांपैकी फुलपाखरूतील ऋता दुर्गुळे आणि यशोमान आपटे आणि टीम , बापमाणूस मधील सुयश टिळक , श्रुती अत्रे व पल्लवी पाटील आणि टीम , आम्ही दोघी मधील विवेक सांगळे , खुशबू तावडे व प्रसिद्धी किशोर आणि टीम , तू अशी जवळी राहा मधील सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे आणि टीम आणि सूर राहू दे मधील संग्राम साळवी आणि गौरी नलावडे आणि टीम या सर्व कलाकारांचा समावेश असेल. झी युवावरील एवढे सर्व कलाकार एकत्र एका जागी पाहण्याची नामी संधी ठाण्यातील प्रेक्षकांसाठी झी युवा घेऊन आली आहे .
ठाण्यातील झी युवा च्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या आवडत्या कलाकारांसोबत दांडिया खेळण्याची ही एक सुवर्णसंधी असून प्रेक्षकांनी देखील त्यासाठी तयारी सुरु करावी . १५ ऑक्टोबरला श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान, भगवती शाळेचे मैदान, विष्णु नगर, नौपाडा, ठाणे येथे , झी युवा आणि श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान’ घेऊन येत आहे “झी युवा दांडिया २०१८ ‘
कार्यक्रम : झी युवा दांडिया
कुठे : श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान, भगवती शाळेचे मैदान, विष्णु नगर, नौपाडा, ठाणे
वेळ : ७ ते ९ वाजेपर्यंत
मालिका कलाकार उपस्तीथी : फुलपाखरू , बापमाणूस , आम्ही दोघी , तू अशी जवळी राहा , सुर राहू दे