Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘ह्या गोजिरवाण्या घरात’ लवकरच रंगभूमीवर

Date:

व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना सध्या सुगीचे दिवस आले आहे. उत्कृष्ट कथानक आणि नेपथ्य यांच्या जोरावर आज अनेक नाटकांनी मायबाप रसिकांच्या मनात आपली हक्काची जागा मिळवली आहे. त्यामुळेच तर अनेक कौटुंबिक नाटकांना देखील रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. असेच एक वेद प्रोडक्शन निर्मित आणि मुक्तायन प्रस्तुत  ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ हे कौटुंबिक नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे.
मानस लयाळ लिखित या नाटकामध्ये  सुप्रिया पाठारे, साईकीत कामत आणि अदिती द्रविड हे तीन कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. छोटा पडदा गाजवणारे हे तिन्ही कलाकार ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या नाटकाच्या माध्यमातून प्रथमच एकत्र रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे.
‘रात्रीस खेळ चाले’या मालिकेतून नावारूपास आलेला अभिराम म्हणजेच साईकीत कामत आजही लोकांच्या स्मरणात आहे. तर ‘माझ्या  नवऱ्याची बायको’ या झी टीव्हीवरील मालिकेतून अदिती आपले नशीब आजमावताना दिसून येत आहे. सुप्रिया पाठारे यांनादेखील अनेक मालिकेतून आणि चित्रपटातून पहिले असल्यामुळे ही तिकडी रंगभूमीवर काय धम्माल करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या नाटकाच्या शीर्षकावरूनच चार भिंतीच्या आत घडणारे हे नाटक असल्याचा अंदाज आल्यावाचून राहत नाही. हे नाटक कौटुंबिक जरी असले तरी त्यात साई-पियुष या जोडीने सुरेख संगीताचा संगम देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे रसिकांना नाट्यसंगीताचा आस्वाद देखील चाखता येईल.
नवरा, बायको आणि आई असे तिघांचे दृष्ट लागेल असा संसार या नाटकात पाहायला मिळणार आहे. आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला हवी असलेली स्वतःची स्पेस आणि त्यामुळे वाढणारा नात्यातला गोडवा या नाटकाचा प्रमुख सार आहे. असे सारे काही आलबेल, गोंडस आणि गोजीरवाणे असतानाच या तिघांपैकी एकाच्या आयुष्यात अघटीत घडते, अनपेक्षित झालेल्या या आघाताचा परिणाम तिघांच्या जीवनावर आणि स्वाभाविकतः घरावर देखील होतो, अशावेळी हे कुटुंब स्वतःला कसे सावरते, हे सारे काही या नाटकात पाहायला मिळणार आहे. अंकुर काकतकर  दिग्दर्शित हे नाटक आजच्या आधुनिक कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहे. गोपाल अलगेरी आणि तनुजा कुलकर्णी या नाटकाचे निर्माते असून, योगिता औरादकर या सहनिर्मात्या आहेत. २७ डिसेंबरपासून ‘या गोजिरवाण्या घरात’ या नाटकाच्या दौ-याला संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...