Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

स्वराच्या साक्षीने जूळूनी आल्या रेशीमगाठी …

Date:

 

पुणे ता. १९ :कला ही कलाकाराचे संपूर्ण जीवन व्यापून टाकते, या कलेतून झपाटलेल्या कलाकारास जळी-स्थळी-आणि पाषाणीही फक्त कलेचाच अंश दिसत असतो. नुकताच याचा तंतोतंत प्रत्यय आला. महान गायक व अभिनेते किशोरकुमार यांचे चाहते असलेले पुण्याचे प्रसिद्ध गायक जितेंद्र भूरूक यांनी चक्क आपल्या मुलीच्या लग्न समारंभासाठी संगीत व वाद्याच्या साहाय्याने आगळीवेगळी सजावट करून उपस्थितांचे लक्ष वेधले. या सजावटीमुळे समारंभाचा संपूर्ण माहोलच जरा हटके ठरला.

कारण, एरवी लग्नाच्या पाककृतीमध्ये रमणारी समस्त वऱ्हाडी मंडळी या लग्नाच्या मात्र सजावटीकडे पाहूनच अचंबित होत होती. स्वागत कक्षेपासून ते वधू-वरांच्या व्यासपीठापर्यंतचा सारा परिसरच जणू संगीतमय होता. अभिजात संगीत कलेला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांची स्वागत कक्षेत पोर्टेट उभारण्यात आली होती. तर भव्य व्यासापीठाला साजेशा अशा वीणा, सतार, हार्मोनिअम, तबला, गिटार, संवादिनी आदी पारंपारिक वाद्यवृंदांच्या प्रतिमांनी सर्वांनाच ‘येड’ लावले. जुन्या पद्धतीचे रेकॉर्डस आणि नव्या पद्धतीच्या सीडी गुंफून तयार करण्यात आलेली अनोखी तोरणे उपस्थितांना विशेष भावत होती. वाद्यप्रेमींसाठी तर स्वतंत्र कक्षच तयार करण्यात आला होता. या कक्षेत जावून कोणालाही वाद्य वाजवण्याची मुभा होती. त्यामुळे वाद्यप्रेमींसाठी तर ही मेजवानीच ठरली. आकर्षक प्रकाशयोजनेमुळे या स्वरमयी वातावरणाला चारचाँद लावले. एका कलाकाराने कलेला अशा स्वरूपात अभिवादन केल्याची बहुदा ही पहिलीच घटना असल्याने या लग्नाचा साक्षीदार ठरलेल्या प्रत्येकालाच एक विलक्षण कलाकृतीचा अनुभव घेता आला.

किशोर कुमार यांचे जबरदस्त चाहते असलेले जितेंद्र भूरूक यांना पुण्याचे किशोरकुमार असेही संबोधले जाते. अशा अवलिया कलाकाराची दखल नुकतीच मध्यप्रदेश सरकारने घेतली होती. मध्यप्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

‘भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती...

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....