पुणे- मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागातील जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची बैठक श्रमिक पत्रकार संघ नवी पेठ येथे नुकतीच संपन्न झाली . यावेळी१० डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले.मानवी हक्काची मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. समाजप्रति समाजातील विविध श्रेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीनां मानव अधिकार दिनी ” मानव अधिकार पुरस्काराने ” सन्मानीत करण्याकरीता कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली. पदाधिकारी यांनी संस्थेच्या ध्येय उद्देशानुसार केलेल्या कामाचा आढावा घेवून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले . सक्रीय पदाधिकारी यांना पदोउन्नती देवून त्यांच्या सन्मान व सामाजिक कामाचा गौरव करण्यात आला. हिंगोली जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खल्लाळ , उस्मानाबाद , बीड विभाग प्रमुख आब्बास शेख, ठाणे , रायगड जिल्हा विभाग प्रमुख म्हणुन शकिल शेख, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ.गितांजली रीटे , पुणे व नाशिक जिल्हा विभाग प्रमुख म्हणुन राजेश पास्सी , राजापुर तालुका अध्यक्ष म्हणुन कळंबेकर , उदगीर जि.लातुर शहर प्रमुख म्हणुन संतोष निरंगुणे, वेल्हा -जिल्हा पुणे तालुका अध्यक्ष म्हणुन सुनील जगताप यांची नियुक्ती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर , सचिव सोमनाथ सावंत, मुख्य सल्लागार आनिल कदम, कोअर कमिटी सदस्य व संचालक पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा संजना कपुर, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ. संगिता जोगदंड , पुणे शहर अध्यक्ष जावेद शेख , हरी एन पिल्ले , कपिल लांबे सदाशिव घवाळी प्रकाश बोदाडे अँड. अजय लिंबुटे महादेव सुर्यवंशी आनिल अँब्राल सोमनाथ कोरे , घोरपडे, विकास शहाने , प्रदिप वाजा ठाणे शहर उपाध्यक्ष, ठाणे शहर सचिव रंजना रसाळ , अंबिका हेगडे , शोभा कांबळे आधी पदाधिकारी उपस्थित होते