पुणे-हरीत लवाद न्यायालयात दावा प्रलंबित असताना रस्ते विकास महामंडळाकडून झाडाची कत्तल करण्यात येत असल्याचा आरोप मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी केला आहे .
यासंदर्भात प्रसिद्धीस पाठवलेल्या ईमेलपत्रात त्यांनी म्हटले आहेकी ,राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील निगडी-देहूरोड दरम्यानच्या रस्तारुंदीकरणासाठी अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या तोडी विरोधात मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतिने हरीत लवाद न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. दि.२५ मे रोजी न्यायालयात दाव्याची सुनावणी झाली त्यावेळी त्यावेळी रस्ते विकास महामंडळाकडून न्यायालयाला दिलेल्या झाडाच्या आडेवारीची तफावत व महाराष्ट्र ( नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन १९७५च्या कायद्यातील तरतुदीनुसार परवानगी नसताना केवळ अँडमिस्ट्रेशन कंमाडन्ट स्टेशनक्वार्टस देहुरोड यांनी दिलेल्या ना हरकत दाखल्यावरुन सदर ठिकाणील वृक्षतोड करण्यात केली आहे ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिली. त्यावर न्यायालयाने अँडमिस्ट्रेशन कंमाडन्ट स्टेशनक्वार्टस देहुरोड यांच्या ना हरकत दाखल्या विरोधात त्यांच्या आपिलेट आधिकारी यांच्याकडे आपिल करण्याचे निर्देश दिले. असे असताना रस्ते विकास महामंडळाकडून आज दि.३० मे रोजी भक्ती शक्ती चौकाच्या पुढील बाजुची झाडे तोडण्यात आली आहेत. याबाबत निवासी जिल्हाधिकारी यांना फोनवरुन आम्ही माहिती दिली त्यावेळी त्यांनी रस्ते विकास महामंडळ यांच्या आधिकारी यांच्याशी बोलून कारवाई बाबत कळविण्यात येईल असे सांगितले .न्यायालयात दावा प्रलंबित असताना आज केलेल्या वृक्षतोड विरोधात पोलिस एफ आय आर दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी करावेत म्हणुन संस्थेच्या वतिने दि.३१ मे २०१७ रोजी निवेदन देवून मागणी करणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांनी सदर ठिकाणील वृक्षतोडसाठी अँडमिस्ट्रेशन कंमाडन्ट स्टेशनक्वार्टस देहूरोड यांनी दिलेला ना हारकत दाखला म्हणजेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र ) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम १९७५ च्या कायद्यातील तरदुदी प्रमाणे वृक्षतोडस परवानगी समजावी किंवा नाही हे स्पष्ट करण्याच्या मागणीचे निवेदन देणार असल्याची ही माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर , पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड , अँड.रुपाली वाईकर , जावेद शेख, मुरलीधर दळवी , विकास शाहाने , आरुन मुसळे यांनी या पत्राद्वारे दिलीआहे .