आमदार जगदिश मुळीक यांनी प्रचाराचा नारळ फोडला…
वडगाव शेरी ः गेल्या पाच वर्षामध्ये वडगावशेरी मतदार संघाचा विकास झाला आहे. विकासाची गती कायम ठेवण्यासाठी नगरीक भाजपला साथ देतील असा मला विश्वास आहे असे मत वडगावशेरी मतदार संघतील महायुती भाजप चे उमेदवार आमदार जगदिश मुळीक यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणूकीचे वडगाव शेरी मतदार संघातील भाजप महायुतीचे आमदार जगदिश मुळीक यांच्या प्रचाराचा नारळ येरवडा येथे फोडला. या प्रचार रॅलीला नागरीकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
वडगावशेरी मतदार संघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार जगदिश मुळीक यांनी येरवडा येथील पर्णकृटी पोलिस चौक येथे प्रचाराचा नारळ फोडला . त्यांनतर येरवडा गावठाणामध्ये प्रचार फेरी काढली. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक बापुसाहेब कर्णे गुरूची, अनिल टिंगरे, अॅड अविनाश साळवे, संदिप ज-हाड, राहुल भंडारे, मारुती सांगळे, शितल सावंत, फरजाना शेख, मुक्ता जगताप, ऐश्वर्या जाधव, सुनिता गलांडे, शितल शिंदे, श्वेता चव्हाण, श्वेता खोसे गलांडे , शिवसेनेचे आनंद गोयल, संतोष राजगुरू यांच्या सह भाजप, शिवसेना, आरपीआय चे कार्यकर्ते आणि नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी आमदार मुळीक म्हणाले की, मतदार संघामध्ये पायाभुत सुविधा सह महाराष्ट्रातील पहिला बंदिस्त फुटपाथ केला. सेवन डी थियटर, पाम उद्यान आणि दोनशे पेक्षा जास्त ओपन जीम केले आहेत. मतदार संघातील 11 हजार कुटुंबांना पाईपलाईनव्दारे गॅस पुरवठा केला जात आहे. लोहगाव मध्ये शंभर खाटाचे रुग्णालय, लोहगाव विमानतळीच् विस्तारीकरणाचे काम केले. येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयामध्ये डायलेसिस सुविधा केंद्र, तारकेश्र्वर देवस्थानला क दर्जाचे पर्यंटन स्थळाचा दर्जा मिळवणून दिला. लोहगाव हिरण तळाचा विकास करण्यात येणार आहे. यासारख्या अनेक विकासकामे वडगाव शेरी मतदार संघामध्ये केले आहे. राष्ट्रवादीच्या काळात वडगावशेरी मतदार संघ समस्यांचा आगार बनला होत. पण गेल्या पाच वर्षात वडगावशेरी मतदार संघाचा चांगला विकास झाला.