Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

याहीवर्षीचा ‘वसंतोत्सव’ असणार विनामूल्य

Date:

पुणे, : अभिजात भारतीय संगीतरत्न असलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीत डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला ‘वसंतोत्सव’ यावर्षी २० ते २२ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. न्यू इंग्लीश स्कूल, रमणबाग येथे सायंकाळी ५.४५ ते १० या वेळेत हा महोत्सव होणार असून  रसिक श्रोत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एका भाग म्हणून मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षीचा ‘वसंतोत्सव’ विनामूल्य असणार असल्याची घोषणा प्रख्यात शास्त्रीय गायक व डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

 

यंदाचे महोत्सवाचे हे दहावे वर्ष असून यावर्षी महोत्सवाला गोखले कन्स्ट्रक्शन्स हे मुख्य प्रायोजक तर मराठे ज्वेलर्स आणि वास्तुशोध प्रोजेक्ट्स हे सहप्रायोजक म्हणून लाभले आहेत. व्हाईट कॉपर एंटरटेन्मेंट या संस्थेवर महोत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले, संचालिका पूनम गोखले आणि मराठे ज्वेलर्सचे संचालक मिलिंद मराठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

महोत्सवाची माहिती देताना राहुल देशपांडे म्हणाले, ”वसंतोत्सव संगीत महोत्सवात संगीतातील वेगवेगळ्या प्रकारांचा मिलाफ साधण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही जपत आहोत. यंदाच्या महोत्सवातही अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतासह, नाट्यसंगीत, लोकप्रिय फ्युजन आदी संगीत प्रकारांचा समावेश असणार आहे.”

 

‘वसंतोत्सव- २०१७’ चे उद्घाटन शुक्रवार, दिनांक २० जानेवारी रोजी ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने होईल. यानंतर कृष्णाजी खाडिलकर लिखित प्रसिद्ध संगीत नाटक ‘मानापमान’ याचे सादरीकरण होईल. बालगंधर्वांनी अजरामर केलेल्या या कलाकृतीचे सुश्राव्य सादरीकरण या महोत्सवादरम्यान प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे करतील.

 

दुस-या दिवसाची सुरवात प्रसिद्ध सिनेगायिका रेखा भारद्वाज यांच्या गायनाने होईल. आवाजाचा वेगळा पोत जपणाऱ्या या गायिकेने आजवर अनेक उत्तम सिनेगीते रसिकांना भेट दिली आहेत. आपल्या वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करत दुसऱ्या दिवसाचा समारोप प्रख्यात बासरीवादक पं. रोणू मुजुमदार आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या एकत्रित सादरीकरणाने होईल.

 

महोत्सवाच्या तिस-या दिवसाची सुरवात आनंद्गंधर्व म्हणून सुपरिचित असलेले किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या गायनाने होईल. तर महोत्सवाचा समारोप प्रख्यात रॉक बँड ‘इंडियन ओशन’ यांच्या गायन व सुप्रसिद्ध वादक पं. विश्व मोहन भट यांच्या फ्युजनने होईल.

 

दरवर्षी वसंतोत्सवादरम्यान देण्यात येणा-या पुरस्कारांची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. यंदाचा ‘डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सन्मान’ हा ज्येष्ठ गायिका सुलभा ठकार व अनेक दशके आपल्या ऑर्गन वादनाने रसिकांना भुरळ घालणाऱ्या राजीव परांजपे यांना प्रदान केला जाणार आहे. सदर पुरस्कार मराठे ज्वेलर्सने प्रायोजित केला असून रुपये ५१ हजार रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

 

तसेच व्हाईट कॉपर एंटरटेन्मेंटच्या वतीने देण्यात येणारा ‘डॉ. वसंतराव देशपांडे उदयोन्मुख कलाकार पुरस्कार’ यावर्षी गायनातील कारकीर्द सुरु केलेला युवा गायक श्रीपाद लिंबेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. २५ हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी या पुरस्कारांचे वितरण होईल.

 

गेल्या वर्षी प्रमाणे याहीवर्षी ‘वसंतोत्सव विमर्श’ या एकदिवसीय संगीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक  १९ जानेवारी २०१७  रोजी घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात आयोजित करण्यात येणार आहे. या अंतर्गत होणाऱ्या पहिल्या सत्रात सकाळी ११ ते १ या वेळेत प्रसिद्ध गायक पं. विजय कोपरकर, रियाजाच्या विविध पद्धती आणि त्यांचे महत्व उपस्थितांना उलगडून सांगतील. तर दुपारी २ ते ४ या वेळेत होणाऱ्या दुसऱ्या सत्रात ते राग खुलविण्याच्या काही प्रकारांबद्दल रसिकांना मार्गदर्शन करतील. सदर कार्यक्रमास प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश विनामूल्य आहे.

 

यावेळी बोलताना गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या संचालिका पूनम गोखले म्हणाल्या, ‘’तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ‘वसंतोत्सव’ सारख्या महत्वाच्या संगीत महोत्सवाशी आम्ही मागील काही वर्षांपासून वर्षापासून जोडले गेलो आहोत याचा आम्हाला आनंद आहे. या महोत्सवाला शक्य त्या सर्व प्रकारे सहकार्य करण्याचा आमचा मनोदय आहे. तसेच भविष्यातही हे नाते असेच टिकून राहील अशी आमची अपेक्षा आहे.’’

 

मराठे ज्वेलर्सचे भागीदार मिलिंद मराठे म्हणाले, ” संगीताच्या क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या या महोत्सवाशी गेल्या काही काळापासून आम्ही संलग्न आहोत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पुण्यातील एकूणच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ‘वसंतोत्सव’ची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे आम्ही या महोत्सवाच्या कायमच सोबत राहणार आहोत.”

 

वसंतोत्सव’शी जोडले जाणे ही भावनाच खूप आनंददायी आहे. या महोत्सवातून अत्यंत वैविध्यपूर्ण अशा प्रकारचे संगीत सादर केले जाते. संगीताच्या क्षेत्रातील महत्वाचे कलाकार या महोत्सवाच्या रंगमंचावर येतात आणि पुणेकर रसिकांपुढे आपली कला सादर करतात. त्यामुळे या महोत्सवाशी निगडीत असणे हे आमच्यासाठी विशेष आहे.” असे ‘वास्तुशोध प्रोजेक्ट्स’चे व्यवस्थापकीय संचालक सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.

 

‘वसंतोत्सव’साठीच्या विनामूल्य प्रवेशिका दिनांक १४ जानेवारी २०१७, सकाळी ११ पासून बालगंधर्व रंगमंदिर व पंडित फार्म्स, कर्वेनगर या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्वावर या विनामूल्य प्रवेशिका देण्यात येणार असून या प्रवेशिकांमध्ये खुर्ची व भारतीय बैठक या श्रेणीतील प्रवेशिकांचा समावेश असेल. प्रत्येक व्यक्तीस केवळ दोन प्रवेशिका देण्यात येणार असून प्रवेशिकेशिवाय महोत्सवास प्रवेश मिळणार नाही याची रसिकांनी कृपया नोंद घ्यावी. महोत्सवाला येणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांची संख्या लक्षात घेता, त्यांच्यासाठी खुर्चीच्या प्रवेशिका शिल्लक ठेवून तरुण रसिक प्रेक्षकांनी भारतीय बैठकीच्या प्रवेशिका घ्याव्यात अशी नम्र विनंती राहुल देशपांडे यांनी तरुण रसिकांना केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....