अमेरिकेतील इलेक्ट्रिक कार कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री

Date:

बेंगलोर -जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतामध्ये एन्ट्री झाली आहे. अमेरिकन कार कंपनी टेस्लाने आपल्या भारतातील पहिल्या ऑफीससाठी बेंगलोर ची निवड केली आहे. यापूर्वी मस्क यांनी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी टेस्लाची 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला कंपनीने बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात टेस्ला कंपनीचे ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच ठिकाणी कंपनीचे संशोधन आणि विकास ऑफिसदेखील असेल. ‘टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी’ असे भारतातील कंपनीला नाव देण्यात आले आहे. यासाठी कंपनीने भारतामधील कामकाज पाहण्यासाठी तीन संचालकांची नियुक्ती केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी टेस्लाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की,’कर्नाटक ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने भारताला घेऊन जाईल. इलेक्ट्रिक व्हेइकल मॅन्युफॅक्चरर टेस्ला लवकरच बंगळुरूमध्ये आर अँड डी युनिटद्वारे आपले काम सुरू करणार आहे. मी भारत आणि कर्नाटकमध्ये इलोन मस्कचे स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.’

यापूर्वी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर 2020 मध्ये टेस्ला भारतात येणार असल्याचे म्हटले होते. गडकरी म्हणाले होते की, ‘अमेरिकेतील ऑटो क्षेत्रातील मोठी कंपनी टेस्ला पुढील वर्षी भारतात आपल्या कारच्या वितरणासाठी केंद्र सुरू करणार आहे. मागणीच्या आधारावर कंपनी इथे वाहन निर्मितीचा कारखाना सुरू करेल. पुढील पाच वर्षात जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक वाहन उत्पादक बनण्याची क्षमता भारतात आहे.’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नदीत सुधार प्रकल्पातील त्रुटींमुळेच पूरस्थिती; जबाबदारांवर कारवाई करा : डॉ. सिद्धार्थ धेंडे

पुण्यातील प्रभाग क्रमांक दोनसह अनेक वस्त्यांमध्ये पाणी* धरणांतून पाणी न...

🟥 सोमवार पेठेतील जीर्ण दुमजली वाडा कोसळला

🟨 रहिवाशांना आधीच सुरक्षित बाहेर काढल्याने जीवितहानी टळली; धोकादायक...

संकटसमयी धावून आले ‘पीएमआरडीए’चे देवदूत! मुसळधार पावसात युद्धपातळीवर बचावकार्य; शेकडो नागरिकांचे वाचवले प्राण!

मावळ, लोणावळा परिसरात दरड कोसळल्याच्या दुर्घटनांनंतर 'पीएमआरडीए'च्या 'पीडीआरएफ'कडून तात्काळ...

महापालिकेकडून ७५ कुटुंबांतील ३०० नागरिकांना निवारा

पुणे, दि. ६ :पुणे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर...