टेस्ला कर्नाटकला : मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

Date:

जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची अखेर भारतात एन्ट्री झाली आहे. कंपनीने कर्नाटकातील बंगळुरुमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी केली आहे. दरम्यान, यावरुन आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.

संदीप देशपांडे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर म्हटले की, “टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला, पेज 3 मंत्र्यांना झटका. बोलाची कढी बोलाचा भात,” अशा शब्दात देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले होते. यासंदर्भात आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी टेस्लाच्या टीमसोबत चर्चाही केली होती. यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली होती. परंतु टेस्लाने महाराष्ट्रऐवजी कर्नाटकला पसंती देत बंगळुरुमध्ये नोंदणी केली.

अमेरिकन कार कंपनी टेस्लाने आपल्या भारतातील पहिल्या ऑफीससाठी बंगळुरुची निवड केली आहे. यापूर्वी मस्क यांनी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी टेस्लाची 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी टेस्लाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की,’कर्नाटक ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने भारताला घेऊन जाईल. इलेक्ट्रिक व्हेइकल मॅन्युफॅक्चरर टेस्ला लवकरच बंगळुरूमध्ये आर अँड डी युनिटद्वारे आपले काम सुरू करणार आहे. मी भारत आणि कर्नाटकमध्ये इलोन मस्कचे स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.’

टेस्ला कंपनीने बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात टेस्ला कंपनीचे ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच ठिकाणी कंपनीचे संशोधन आणि विकास ऑफिसदेखील असेल. ‘टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी’ असे भारतातील कंपनीला नाव देण्यात आले आहे. यासाठी कंपनीने भारतामधील कामकाज पाहण्यासाठी तीन संचालकांची नियुक्ती केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

🟥 सोमवार पेठेतील जीर्ण दुमजली वाडा कोसळला

🟨 रहिवाशांना आधीच सुरक्षित बाहेर काढल्याने जीवितहानी टळली; धोकादायक...

संकटसमयी धावून आले ‘पीएमआरडीए’चे देवदूत! मुसळधार पावसात युद्धपातळीवर बचावकार्य; शेकडो नागरिकांचे वाचवले प्राण!

मावळ, लोणावळा परिसरात दरड कोसळल्याच्या दुर्घटनांनंतर 'पीएमआरडीए'च्या 'पीडीआरएफ'कडून तात्काळ...

महापालिकेकडून ७५ कुटुंबांतील ३०० नागरिकांना निवारा

पुणे, दि. ६ :पुणे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर...