पुणे विभागातील 17 लाख 19 हजार 464 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 18 लाख 2 हजार 123 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 19 : पुणे विभागातील 17 लाख 19 हजार 464 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 2 हजार 123 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 45 हजार 448 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 37 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.41 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 71 हजार 437 रुग्णांपैकी 10 लाख 43 हजार 371 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 994 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.38 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 8 हजार 591 रुग्णांपैकी 1 लाख 95 हजार 119 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 429 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 70 हजार 537 रुग्णांपैकी 1 लाख 63 हजार 196 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 861 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 64 हजार 646 रुग्णांपैकी 1 लाख 49 हजार 610 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 641 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 395 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 86 हजार 912 रुग्णांपैकी 1 लाख 68 हजार 168 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 523 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 849 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 152, सातारा जिल्ह्यात 821, सोलापूर जिल्ह्यात 391, सांगली जिल्ह्यात 1 हजार 110 तर कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 375 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 93 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 328, सातारा जिल्हयामध्ये 897, सोलापूर जिल्हयामध्ये 353, सांगली जिल्हयामध्ये 957 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 558 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरणाचे प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 50 लाख 51 हजार 854, सातारा जिल्ह्यामध्ये 11 लाख 17 हजार 676, सोलापूर जिल्हयामध्ये 8 लाख 57 हजार 871, सांगली जिल्हयामध्ये 10 लाख 22 हजार 609 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 15 लाख 34 हजार 895 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 19 लाख 90 हजार 394 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 2 हजार 123 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 18 जुलै 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)