..त्वरित पंचनामे करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा

Date:


नॅशनल पार्कमधील प्रलंबित पुलाचे काम तातडीने पूर्ण करा
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली नुकसानग्रस्त दुकानांची आणि बोरिवलीतील मिठी नदीची पाहणी

मुंबई, दि. १९ जुलै – शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे बोरिवलीतील अनेक भागांत कंबरेभर पाणी साचले होते. बोरिवली पूर्व येथील शांतिवन परिसरातील व्यापारी व घरांना याचा फटका बसला.
बोरिवलीतील या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या दुकानांच्या नुकसानीची पाहणी केली. तेथील रहिवाशांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच बोरिवलीतून जाणाऱ्या मिठी नदीची विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पाहणी केली.व्यापाऱ्यांचे नुकसान भरून देण्यासाठी त्यांच्या दुकानाचे त्वरित पंचनामे करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
दरेकर म्हणाले, अतिवृष्टीमुळे बोरिवलीतील मिठी नदीची पाण्याची पातळी वाढली असून सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. नदीकाठी वसलेले शांतिवन परिसर, श्रीकृष्णनगर दरवर्षी जलमय होतात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना दरवर्षी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असते. आजही नदीकाठी असलेल्या अनेक झोपडपट्ट्या, सोसायटी आणि दुकानांमध्ये पाणी साचले असून नांगरिकांसहित व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच लॉकडाउनमुळे व्यापारी निराश झाला आहे. त्यात आता मुसळधार पावसामुळे असे नुकसान झाल्यामुळे व्यापारी खचला जाणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
नॅशनल पार्कमधील प्रलंबित पुलाचे काम लवकरात लवकर करा
नॅशनल पार्कमधील प्रलंबित पुलावरून दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि मनपा अधिकाऱ्यांना खडसावले. पुलाचे काम लवकर लवकर पूर्ण करा, असे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. तसेच अतिरिक्त आयुक्त वेलारासूंसोबत बैठक घेणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, मागाठाणे भाजप अध्यक्ष दिलीप उपाध्याय, विक्रम चौघुले, हेमचंद्र नार्वेकर, संजय शिरवडकर, वॉर्ड अध्यक्ष संजय मोरे, लक्ष्मण कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक...

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...