पुणे विभागातील 17 लाख 37 हजार 15 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 18 लाख 19 हजार 226 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 23 : पुणे विभागातील 17 लाख 37 हजार 15 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 19 हजार 226 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 44 हजार 726 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 37 हजार 485 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.48 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 75 हजार 898 रुग्णांपैकी 10 लाख 48 हजार 82 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 703 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.41 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 11 हजार 790 रुग्णांपैकी 1 लाख 97 हजार 813 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 867 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 110 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 72 हजार 402 रुग्णांपैकी 1 लाख 64 हजार 458 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 437 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 507 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 68 हजार 123 रुग्णांपैकी 1 लाख 53 हजार 774 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 891 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 458 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 91 हजार 13 रुग्णांपैकी 1 लाख 72 हजार 888 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 828 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 297 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 335 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 131, सातारा जिल्ह्यात 886, सोलापूर जिल्ह्यात 460, सांगली जिल्ह्यात 828 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 30 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 597 आहे. पुणे जिल्हयामध्ये 818, सातारा जिल्हयामध्ये 254, सोलापूर जिल्हयामध्ये 304, सांगली जिल्हयामध्ये 913 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 308 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 22 लाख 68 हजार 135 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 19 हजार 226 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 22 जुलै 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)