महेश सेवा संघाचा उपक्रम
पुणे :
महेश सेवा संघाच्या वतीने कामगार दिनी टिम्बर मार्केट कामगारांसाठी वॉटर कूलर चे उदघाटन करण्यात आले . महेश सहकारी बँकेचे अध्यक्ष पूनमचंद धूत ,महेश सेवा संघ अध्यक्ष प्रवीण भराडिया ,उपाध्यक्ष जुगल पुंगलिया ,सचिन नावंदर ,सचिव श्यामसुंदर मुंदडा ,संचालक जवाहर बाहेती आणि दलित स्वयंसेवक संघाचे रवी पाटोळे यांच्या हस्ते उदघाटन झाले . कामगार दिनी लहुजी वस्ताद चौक ,टिम्बर मार्केट येथे हा कार्यक्रम झाला .
यावेळी अजित दरेकर ,अशोक राठी ,श्यामसुंदर कलंत्री ,राकेश कामठे उपस्थित होते . दलित स्वयंसेवक संघाचे रवी पाटोळे यांनी स्वागत केले . यावेळी कामगारांना टोप्यांचे वाटप करण्यात आले