पुणे- शुक्रवार पेठेत वाड्यांला आग लागली. या आगीत एकाचा मृत्यू झाला असून अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आहेत. प्रवीण बन्सल (वय. ४५) असे या आगीत मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे.
अग्निशमन दलाच्या १२ गाड्यांच्या मदतीने एका वाड्याच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. परंतु दुसऱ्या वाड्याची आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
शुक्रवार पेठेतील एका तीन मजली जुन्या वाड्याला पहाटे चारच्या सुमारास आग लागली. वाड्यात कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली. परंतु ही आग शेजारच्या वाड्यापर्यंत पोहोचली. दुसऱ्या वाड्याची आग विझवताना भिंत कोसळल्याने अग्निशमन दलाच्या चार जवानांसह एक स्थानिक नागरिक जखमी झाला. उपचारादरम्यान या नागरिकाचा मृत्यू झाला. दरम्यान या वाड्यांशेजारी असलेले इतर वाडे रिकामे करण्यात आले आहेत.