पुणे विभागात आज ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 45 हजार 483

Date:

पुणे विभागातील 8 लाख 96 हजार 807 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 10 लाख 62 हजार 601 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 24 : पुणे विभागातील 8 लाख 96 हजार 807 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 62 हजार 601 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 45 हजार 483 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 20 हजार 311 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.91 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.40 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 7 लाख 63 हजार 194 रुग्णांपैकी 6 लाख 49 हजार 565 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 1 हजार 839 आहे. कोरोनाबाधित एकूण 11 हजार 790 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.54 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.11 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 88 हजार 250 रुग्णांपैकी 69 हजार 676 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 499 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 85 हजार 379 रुग्णांपैकी 71 हजार 81 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 849 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 65 हजार 557 रुग्णांपैकी 53 हजार 769 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 778 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 60 हजार 221 रुग्णांपैकी 52 हजार 716 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 518 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 987 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ-
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 15 हजार 210 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 841, सातारा जिल्ह्यात 1 हजार 816, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 468, सांगली जिल्ह्यात 1 हजार 264 तर कोल्हापूर जिल्ह्यात 821 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या एकूण 12 हजार 366 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 186, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 365, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 70, सांगली जिल्हयामध्ये 463 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 282 रुग्णांचा समावेश आहे.

विभागातील लसीकरण

विभागामध्ये 22 एप्रिल 2021 पर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यातील 19 लाख 13 हजार 251, सातारा – 5 लाख 4 हजार 947, सोलापूर- 2 लाख 88 हजार 410, सांगली- 4 लाख 34 हजार 229 व कोल्हापूर जिल्ह्यातील 3 लाख 58 हजार 52 नागरिकांचा समावेश आहे.

(टिप :- दि. 22 एप्रिल 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तबला-पखवाज जुगलबंदी अन्‌ संतूरवादनातून ’हाजरी’

पुणे : तबला आणि पखवाजवादनाची जोरकस जुगलबंदी आणि संतूरवाद...

खरी समृद्धी ज्ञानातूनच निर्माण होते – डॉ. श्रीपाल सबनीस

लक्ष्मी रोडची ओळख सरस्वतीच्या ज्ञानपरंपरेशीही जोडली जावी - डॉ.श्रीपाल...

भीमाशंकर जंगलतोड वादात नवे वळण! ‘आमचा संबंध नाही’ — अदानी समूह; ‘प्रकल्प आमचाच’ — टॉरेंट पॉवर

३२,४९० वृक्षांच्या तोडीचा प्रश्न कायम; २३३ हेक्टर वनजमिनीवरील ३,०००...