पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न येत्या आठवड्यात सोडवू – उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील प्रश्न येत्या आठवडाभरात सोडवू, असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिला.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, अशी मागणी महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनेमार्फत करण्यात आली आहे. या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्यात यावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. या वेळी पवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनास पुढील आठवडाभरात राज्य सरकारची मान्यता मिळेल, असा शब्दही अजित पवार यांनी दिला. याबद्दल सर्व कामगार संघटना, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले.

महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणेकरांची काळजी घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटल्यानंतर इतर सर्व प्रश्नही लवकरात लवकर सुटण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी या वेळी व्यक्त केला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या. दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्यासह पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट्ट, पुणे महानगरपालिका अभियंता संघाचे सचिव सुनील कदम, पुणे महानगरपालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष प्रदीप महाडिक, गोपाळ चव्हाण, मधुकर नरसिंगे, चंद्रकांत गंबरे आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यात

‘मास्मा रिन्यूएबल एनर्जी एक्स्पो’ १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पुणे, ...

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील उद्याच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा.

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २०२६ केंद्रातील भाजपा सरकारने कामगार कायद्यात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जनतेची फसवणूक, वीज स्वस्त नाही तर १६% ने महाग होणार: अतुल लोंढे

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक, तेलंगणा, गुजरातमधील वीज दर स्वस्त कसे, अदानीच्या...