राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगतापांचे भाजपच्या प्रदेशअध्यक्षांना खुले आव्हान

Date:

पुणे-सत्ताधार्‍यांनी कुठल्याही परिस्थितीत महापालिकेच्या ऍमेनिटी स्पेसची विक्री करू नये, याला आमचा विरोधच राहील. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे त्यांच्या पदाधिकार्‍यांच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी आमच्यावर आरोप करत आहेत. पाटील यांना आव्हान आहे, त्यांच्या मागील साडेचार वर्षातील सत्ताकाळात केलेला भ्रष्टाचारासंदर्भात आगेकुच केल्याचा खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.

प्रशांत जगताप म्हणाले, की १८५ पैकी ७४ ऍमेनिटी स्पेस या पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघामध्ये आहेत. याची विक्री करून त्याठिकाणी काय उभारणार आहात? हे जाहीर करावे.
केवळ महापालिकेकडे पैसे नाहीत म्हणून ऍमेनिटी स्पेस विक्रिचे समर्थन करून ते पदाधिकार्‍यांच्या चुकांवर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
महापालिकेकडे २२०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.यापैकी एक हजार कोटी रुपये खर्चून पुणेकरांना अपेक्षित सोयी सुविधा उपलब्ध करणे शक्य आहे. परंतू त्याऐवजी केवळ विरोधकांवर आरोप करून सत्ताधारी दिशाभूल करत आहेत.

याउलट भाजपच्या सत्ताकाळात चोवीस तास पाणी पुरवठा, कात्रज कोंढवा रस्ता अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार रोखण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी आवाज उठविला, हे पाटील लक्षात ठेवावे. महापालिकेच्या मिळकतींच्या नोंदी ज्या लोकप्रतिनिधींच्या ताब्यात आहेत, त्यांच्याकडील थकबाकी महापालिकेने वसुल करावी, ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची भुमिका आहे. त्यामध्ये कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात ऍमेनिटी स्पेसची मर्यादा १५ टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर
करण्यात आल्याबाबत बोलताना जगताप यांनी मुळात युनिफाईड डीसी रुल्स हे देवेंद्र फडणवीस
हे मुख्यमंत्री असतानाच अंतिम करण्यात आले आहेत. ऍमेनिटी स्पेसची मर्यादा का कमी केली याचे उत्तर पाटील यांनी फडणवीस यांच्याकडूनच घेतले तर अधिक बरे होईल, असा टोलाही जगताप यांनी यावेळी लगावला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

PMRDA च्या कारवाईने अनधिकृत होर्डिंगधारकांचे धाबे दणाणले! पुण्यात मात्र राजकारणाने उखळ पांढरे

हवेली, भोरमध्ये अनधिकृत होर्डिंगवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा! दोन दिवसांच्या मोहिमेत...

आता तरी गावांना न्याय द्या -आपले पुणे आपला परिसर

पुणे-पी एम आर डी ए च्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी...

सत्तेच्या हव्यासाने महाराष्ट्र भरकटला: कायद्याचा धाक संपलाय-नसरापूर घटनेवर राज ठाकरे संतप्त

मुंबई-पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार...

लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका:मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई--पुण्याच्या नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणामुळे अवघ्या राज्यात संतापाची...