टाटा कॅपिटलने सुरु केली ‘शेयर्सवर कर्ज’ डिजिटल सेवा

Date:

मुंबई, २३ मे २०२२: आघाडीची आर्थिक सेवा कंपनी आणि टाटा समूहाचा एक भाग, टाटा कॅपिटल लिमिटेडने शेयर्सवर कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. टाटा कॅपिटल एक परिपूर्ण, एकात्मिक डिजिटल आर्थिक सेवा म्हणून शेयर्सवर कर्ज देणाऱ्या पहिल्या आर्थिक संस्थांपैकी एक असून आपल्या ग्राहकांना सहजसोपा, विनासायास अनुभव प्रदान करणे त्यांचा उद्देश आहे.

ग्राहक आपल्या डिमटेरियलाईज्ड शेयर्सना ऑनलाईन तारण ठेवून ५ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकतात, ज्याची सुविधा एनएसडीएलने दिलेली आहे. संबंधित डिपॉजिटरी पार्टीसिपंटकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर सर्व प्रक्रिया त्याच दिवशी पूर्ण होते. यासाठी ग्राहकांना फक्त टाटा कॅपिटलच्या वेबसाईटवर जावे लागेल, आणि याठिकाणी त्यांना मिळेल कागदपत्रे सादर करावी न लागता, वेगवान आणि सहजसोपा सेवा अनुभव. ग्राहकांच्या पोर्टफोलिओमधील शेयर्सच्या मूल्याच्या आधारे कर्जाची रक्कम कस्टमाइज केली जाईल.

टाटा कॅपिटलच्या शेयर्सवर कर्ज डिजिटल सेवेतून मिळणारे प्रमुख लाभ:

·        सुरुवातीपासून शेवटपर्यंत, रजिस्ट्रेशनपासून कर्ज खाते बनवले जाईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया कागदरहित असते. 

·        ऑनलाईन केवायसी आणि एनएसडीएलमार्फत शेयर्स गहाण ठेवले जातात. 

·        ई-एनएसीएच सुविधेसह कर्ज कागदपत्रांवर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षऱ्या केल्या जातात. 

·        ग्राहकांना कर्ज दिले जाणे, कर्जाची परतफेड, अतिरिक्त तारण ठेवणे आणि तारण ठेवलेले शेयर्स सोडवणे यासाठी ऑनलाईन पोर्टल ज्याचा उपयोग करणे खूपच सोपे आहे.

‘शेयर्सवर कर्ज‘ लॉन्च करतेवेळी टाटा कॅपिटलच्या प्रमुख डिजिटल अधिकारी श्रीमती अबोन्ती बॅनर्जी म्हणाल्या, “आमच्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजा सहजपणे पूर्ण करण्यात सक्षम बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांपैकी एक म्हणजे शेयर्सवर कर्ज डिजिटल सेवा. याशिवाय या सेवेला कस्टमाइज केले जाऊ शकते आणि ग्राहक तातडीने फंड्स मिळवू शकतात.  आम्हाला खात्री आहे की यातून आमच्या ग्राहकांना अनेक लाभ मिळतील आणि आम्ही आमच्या डिजिटल उत्पादनांमध्ये अशाप्रकारची आणखी अनेक विशेष उत्पादने आणत राहू.”  

नुकत्याच टाटा कॅपिटलने सुरु केलेल्या ‘म्युच्युअल फंड्सवर कर्ज‘ सेवेला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. टाटा कॅपिटलच्या सर्वात नवीन शेयर्सवर कर्ज सेवेचा लाभ घेण्यासाठी कृपया येथे संपर्क साधा:  https://www.las.tatacapital.com/online/loans/las/apply-now-las-loan

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीच्या शताब्दीनिमित्त पुणे महापालिका राबवणार विशेष उपक्रम

व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शनांसह वर्षभर विविध कार्यक्रम; एक कोटी रुपयांच्या...

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यभरात विविध उपक्रम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती​​मुंबई दि.०६ :- सत्यशोधक...

पुण्यात २०१७ पासून किती झाडे तोडली आणि किती जगली? संपूर्ण हिशेब द्या! — मनसेचे साईनाथ बाबर

वृक्षतोड, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करा; कंत्राटदारांवरील...