स्टेट बँक ऑफ इंडियाची विद्यार्थ्यांसाठी कर्ज योजना – महत्त्वपूर्ण माहिती

Date:

स्टेट बँक ऑफ इंडियाची विद्यार्थ्यांसाठी कर्ज योजना

हे टर्म कर्ज असून भारत किंवा परदेशात जिथे प्रवेश मिळालेला आहे तिथे उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतीय नागरिकांना हे कर्ज दिले जाते.  भारताच्या भवितव्यामध्ये नवपरिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या गरजेनुसार, त्यांना अनुकूल ठरेल अशा पद्धतीने आर्थिक साहाय्य या कर्ज योजनेमार्फत पुरवले जाते.

हे कर्ज पुढील अभ्यासक्रमांसाठी दिले जाते.

§  भारतातील विद्यार्थ्यांसाठी

·         विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)/एआयसीटीई/आयएमसी/सरकार यांनी मान्यता दिलेली महाविद्यालये/विद्यापीठे यांचे पदवी, पदव्युत्तर, नियमित तांत्रिक आणि व्यावसायिक पदवी/पदविका अभ्यासक्रम. आयआयटी, आयआयएम इत्यादी स्वायत्त संस्थांचे नियमित पदवी/पदविका अभ्यासक्रम.

·         केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी मान्यता दिलेले शिक्षक प्रशिक्षण/नर्सिंग कोर्सेस

·         डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशन/शिपिंग/संबंधित नियामक प्राधिकरणाने मान्यता दिलेले नियमित पदवी/पदविका अभ्यासक्रम उदाहरणार्थ, एरॉनॉटिकल, पायलट प्रशिक्षण, शिपिंग इत्यादी.

§  परदेशातील विद्यार्थ्यांसाठी

·         नामांकित विद्यापीठांचे नोकरी मिळवून देणारे व्यावसायिक/तांत्रिक. पदवी/पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रम उदाहरणार्थ, एमसीए, एमबीए इत्यादी.

·         चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स, लंडन, सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट, यूएसए इत्यादी संस्थांचे अभ्यासक्रम.

वैशिष्ट्ये आणि लाभ

·         कमी व्याज दर

·         विद्यार्थिनींसाठी व्याजामध्ये सूट

·         ७.५ लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी तारण ठेवण्याची गरज नाही

·         २० लाखांपर्यंतच्या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क घेतले जात नाही

·         अभ्यासक्रम पूर्ण होऊन एक वर्षानंतर कर्जाची परतफेड करणे सुरु होते.

·         कर्ज परतफेडीचा कालावधी अभ्यासक्रम कालावधी संपल्यानंतर पुढची १५ वर्षे + १२ महिन्यांचा रिपेमेंट हॉलिडे (असा कालावधी ज्यामध्ये कर्जाची परतफेड करणे तात्पुरते थांबवले जाऊ शकते)

·         अधिक उच्च शिक्षणासाठी दुसरे कर्ज घेतले असेल तर दुसरा अभ्यासक्रम संपल्यानंतर दोन्ही कर्जांची मिळून एकत्रित परतफेड १५ वर्षात केली जाऊ शकते. 

·         ४ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी मार्जिन नाही.

कर्जाची रक्कम

भारतातील अभ्यासक्रमांसाठी ५० लाख रुपयांपर्यंतचे आणि परदेशातील अभ्यासक्रमांसाठी १.५० कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज विद्यार्थ्यांना मिळू शकते. 

व्याज दर

·         प्रभावी व्याज दर – ८.६५%

·         विद्यार्थिनींसाठी व्याजामध्ये ०.५०% सवलत

प्रक्रिया शुल्क

·         २० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी – काहीही नाही

·         २० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी – १०,००० रुपये (+ कर)

तारण     

  • ७.५ लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी – काहीही नाही
  • ७.५ लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी – मूर्त तारण

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये हे खर्च समाविष्ट करण्यात आले आहेत:

  • महाविद्यालय/शाळा/वसतिगृह यांना देय फी
  • परीक्षा/ग्रंथालय/प्रयोगशाळा फी
  • पुस्तके/उपकरणे/साधने/युनिफॉर्म यांची खरेदी, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक संगणकाची खरेदी (अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देय असलेल्या एकूण ट्युशन फीच्या २०% इतकी जास्तीत जास्त रक्कम)
  • खबरदारी म्हणून घेतले जाणारे डिपॉझिट/इमारत निधी/परत करण्यायोग्य  डिपॉझिट (संपूर्ण अभ्यासक्रमाच्या ट्युशन फीच्या १०% इतकी जास्तीत जास्त रक्कम)
  • प्रवास खर्च/परदेशात अभ्यासासाठी पॅसेज रक्कम
  • दुचाकीची किंमत ५०,००० रुपयांपर्यंत.
  • अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी करावे लागणारे स्टडी टूर, प्रोजेक्ट काम इत्यादीचे इतर कोणतेही खर्च.

आवश्यक कागदपत्रे आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी वेबसाईट लिंक – https://bank.sbi/web/personal-banking/loans/education-loans/student-loan-scheme

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीच्या शताब्दीनिमित्त पुणे महापालिका राबवणार विशेष उपक्रम

व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शनांसह वर्षभर विविध कार्यक्रम; एक कोटी रुपयांच्या...

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यभरात विविध उपक्रम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती​​मुंबई दि.०६ :- सत्यशोधक...

पुण्यात २०१७ पासून किती झाडे तोडली आणि किती जगली? संपूर्ण हिशेब द्या! — मनसेचे साईनाथ बाबर

वृक्षतोड, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करा; कंत्राटदारांवरील...