एफसी अ, मंदार वाकणकर टेनिस अकादमी अ संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Date:

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत इलाईट डिव्हिजन गटात एफसी अ आणि मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए) अ या संघांनी अनुक्रमे लॉ कॉलेज लायन्स व महाराष्ट्र मंडळ संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
 
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत  एफसी अ संघाने लॉ कॉलेज लायन्स संघावर 24-09 असा विजय मिळवत आगेकूच केली. एफसी अ संघाकडून संजय रासकर, संग्राम चाफेकर, गणेश देवखिळे,  पुष्कर पेशवा, पंकज यादव, सचिन साळुंखे, वैभव अवघडे यांनी अफलातून कामगिरी बजावली. उपांत्य फेरीत एफसी अ संघाचा सामना पीवायसी अ संघाशी होणार आहे.
दुसऱ्या सामन्यात राजेश मंकणी, प्रवीण पांचाळ, मंदार वाकणकर, अमित किंडो, जयदीप वाकणकर, निलेश ओस्तवाल, सुनील लुल्ला, आशिष मणियार यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर मंदार वाकणकर टेनिस अकादमी अ संघाने महाराष्ट्र मंडळला 24-08 असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत एमडब्लूटीए अ संघासमोर पीवायसी ब संघाचे आव्हान असणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: इलाईट डिव्हिजन: उपांत्यपूर्व फेरी:
एफसी अ वि.वि.लॉ कॉलेज लायन्स 24-09(100अधिक गट: संजय रासकर/संग्राम चाफेकर वि.वि.केतन जाठर/श्रीकृष्णा पानसे 6-4; खुला गट: संग्राम चाफेकर/गणेश देवखिळे वि.वि.राहुल पंढरपुरे/प्रोफेसर.जयभाई 6-1; 90अधिक गट: पुष्कर पेशवा/पंकज यादव वि.वि.शिवाजी यादव/अभिजित मराठे 6-1; खुला गट: सचिन साळुंखे/वैभव अवघडे वि.वि.तारख पारीख/केतन जाठर 6-3);

एमडब्लूटीए अ वि.वि.महाराष्ट्र मंडळ 24-08(100अधिक गट: राजेश मंकणी/प्रवीण पांचाळ वि.वि.संजय सेठी/अर्जुन वाघमारे 6-3; खुला गट: मंदार वाकणकर/अमित किंडो वि.वि.अभिषेक चव्हाण/रवींद्र देशमुख 6-2; 90अधिक गट: जयदीप वाकणकर/निलेश ओस्तवाल वि.वि.कमलेश शाह/विकास बचलू 6-2; खुला गट: सुनील लुल्ला/आशिष मणियार वि.वि.संजय सेठी/अर्पित श्रॉफ 6-1).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आषाढी वारीत “महिला उन्नती वारी” उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश

महिला आयोगाच्या विशेष उपक्रमाचा उरुळीकांचन येथून शुभारंभ मुंबई, दि. ११...

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा: हर्षवर्धन सपकाळ

MPSC च्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीवर विद्यार्थ्यांना विश्वास नाही, ऑफलाईन...

प्रशासकीय सेवेत समाज व देशहिताची ध्येय धोरणंआखावीत

तेलंगणाचे डीजीपी महेश भागवत यांचे मतपुणे: डब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा...

वडकी नाला व कदमवाकवस्ती येथे दिंडीप्रमुखांचा सत्कार; वारकऱ्यांसाठी फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

वारीच्या वाटेवर भक्तीचा विसावा; माऊली-तुकोबांच्या पालखी सोहळ्यांचे ‘पीएमआरडीए’कडून भावपूर्ण...