पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना  मानवंदना

Date:

 सारसबागेत चित्रकलेतून ३ हजार १५० चिमुकल्यांनी वाहिली आदरांजली
पुणे :  हुतात्मा सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उभारलेला स्तंभ… पुणे शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी व बँड पथकाने दिलेली मानवंदना आणि ३ हजार १५० शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंबईमधील २६/११ हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हौतात्म्याचे स्मरण सारसबागेत आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फ मुंबईमध्ये २६ / ११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ  सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तसेच पोलीस दलातील पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, संजय पाटील, पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते, सागर कवडे, चिलुमुला रजनीकांत, राजलक्ष्मी शिवणकर, अभिनाश कुमार, पोलीस उप आयुक्त विवेक मासाळ, पी. आर. पाटील आणि संदीप भाजीभाकरे यांसह पोलीस खात्यातील निवृत्त अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी पुणे पीपल्स बँकेच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. बँकेचे  अध्यक्ष बबनराव भेगडे, वसुली अधिकारी संजय राजपूत व सेवक हे उपस्थित होते. सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष राजाभाऊ महाडिक, तन्मय तोडमल, उमेश कांबळे, सचिन ससाणे, अमर लांडे, विक्रांत मोहिते,पराग शिंदे, नमन कांबळे, मित नानावटी यांनी उपक्रमाचे आयोजन केले.आमदार हेमंत रासने, नगरसेविका स्मिता वस्ते, लता गौडा, राजेंद्र काकडे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते.  यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांनी केले.

चित्रकला स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, डॉ. गिरीष चरवड, नितीन होले, संदीप गायकवाड, प्रा. शिवानी पाटील, प्रा. दीपक बोरसे, प्रा. योगेश भास्करे, प्रा. किशोर जाधव, प्रा. प्रणय कुंवर, प्रा. चारुता खारोकर आणि शेखर देडगावकर यांनी काम पाहिले.

* चित्रकला स्पर्धेचा निकाल

स्पर्धेच्या अ गटात (इयत्ता पहिली व दुसरी) प्रथम क्रमांक रुद्रांश अमित शिंदे (नुमवि. शाळा) याने, द्वितीय क्रमांक प्रिशा गणेश कदम (तक्षशिला स्कूल, कोल्हेवाडी) हिने, तर तृतीय क्रमांक कार्तिकेय मानतो (युनिक स्कूल) याने पटकाविला. उत्तेजनार्थ सामिया मणियार (हजी गुलाम मोहमद आजम स्कूल) आणि आरणा मयुर सोनार (दि बीशप को. एज्यु. स्कूल) यांना गौरविण्यात आले.

ब गटात (इयत्ता तिसरी व चौथी) प्रथम क्रमांक पलक सागर भुतडा (आचार्य श्री वल्लभ स्कूल), द्वितीय क्रमांक हर्षिता करादार (एल. एस. एस. बी. इंग्लिश स्कूल), तर तृतीय क्रमांक प्रांजल भरत कुमावत (न्यू इंग्लिश स्कूल, हडपसर) यांनी मिळविला. उत्तेजनार्थ काजल अरुण वर्मा आणि श्रवण वणे (दोघेही किलबिल इंग्लिश स्कूल, धायरी) यांची निवड करण्यात आली.

क गटात (इयत्ता पाचवी ते सातवी) प्रथम क्रमांक अरुण गोवर्धनलाल प्रजापती (किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल, धायरी), द्वितीय क्रमांक ओवी हरीष शेलार (विद्यानिकेतन, बिबवेवाडी), तर तृतीय क्रमांक नारायणी राजेश पाटील (सनग्रेस हायस्कूल, हिंजवडी) यांनी पटकाविला. उत्तेजनार्थ हर्षिता सचिन वरपे (युनिक इंग्लिश मीडियम स्कूल, कात्रज-कोंढवा) आणि आरोही उत्तम गोगावले (सिंहगड सिटी स्कूल, कात्रज) यांना गौरविण्यात आले.

ड गटात (इयत्ता आठवी ते दहावी) प्रथम क्रमांक शौनक सचिन पवार (सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा), द्वितीय क्रमांक अल्फिया शहा (भगत इंग्लिश स्कूल), तर तृतीय क्रमांक विनीत शैलेंद्र माली (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग) यांनी मिळविला. उत्तेजनार्थ आयुष अजय चव्हाण (नवभारत ज्ञानवर्धिनी विद्यालय, वारजे) आणि अनया सिंग (विद्या प्रतिष्ठान, नांदेड सिटी) यांची निवड झाली.

खुल्या गटात प्रथम क्रमांक दर्शना रहाणे (वाडिया कॉलेज), द्वितीय क्रमांक अथर्व अभिजीत कदम (एम. ई. एस.), तर तृतीय क्रमांक श्रावणी चंद्रकांत पाटील (मॉडर्न कॉलेज) यांनी पटकाविला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्तर्फे राज्यस्तरीय संगीत व नृत्य करंडक; दि. ४ आणि ५ डिसेंबर रोजी आयोजन

पुणे : विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, संगीत आणि नृत्य...

एका घटनेवरून संपूर्ण पोलिस दलाला दोष देणे योग्य नाही; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची स्पष्टोक्ती!

मंदार किवळे हल्ल्याप्रकरणी नऊपैकी आठ संशयित पोलिसांच्या ताब्यात; गुन्हे...

पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा चौफेर धडाका; सव्वादोन लाख चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा!

लोहगाव, औंध-बाणेर, पर्वती-सहकारनगर आणि पाषाण-सूस परिसरात मोठी कारवाई; रस्ते...