पुणे-पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत उपांत्य फेरीत पीईएसबी रोअरिंग लायन्स् संघाने टीईसीपीएसएल स्पीडिंग चिताज् संघाचा तर पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाने टॅस पीसीटीए रेजिंग्ज् बुल्स संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पीईएसबी रोअरिंग लायन्स् संघाने टीईसीपीएसएल स्पीडिंग चिताज् संघाचा 33-8 असा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. विजयी संघाकडून आस्मी अडकर ,अनन्मय उपाध्याय, सोनल पाटील, जौश्णव शिंदे, सिध्दार्थ जाडली यांनी विजयी कामगिरी करत संघाला यश मिळवून दिले.
दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाने टॅस पीसीटीए रेजिंग्ज् बुल्स संघाचा 40-35 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. विजयी संघाकडून सिया प्रसादे, पुर्वा भुजबळ, अमोद सबनीस, मधुरीमा सावंत, अर्जुन अभ्यंकर , राघव अमिन व अन्या जेकब यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी
पीईएसबी रोअरिंग लायन्स् वि.वि टीईसीपीएसएल स्पीडिंग चिताज्- 33-8( 10वर्षाखालील मुली: काव्या देशपांडे पराभूत वि देवांशी प्रभुदेसाई 3(2), 4(7), 12 वर्षाखालील मुली- आस्मी अडकर वि.वि आकांक्षा अग्निहोत्री 6-0, 12 वर्षाखालील मुले- अनन्मय उपाध्याय वि.वि पियुष जाधव 6-0, 14 वर्षाखालील मुली- सोनल पाटील वि.वि श्रावणी खवले 6-0, 14 वर्षाखालील मुले- जौश्णव शिंदे वि.वि अनमोल नागपुरे 6-2, 16 वर्षाखालील मुले- सिध्दार्थ जाडली वि.वि यशराज दळवी 6-2)
पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स वि.वि टॅस पीसीटीए रेजिंग्ज् बुल्स- 40-35(10 वर्षाखालील मुली- सिया प्रसादे वि.वि प्रिशा शिंदे 4-1, 10 वर्षाखालील मुले- सुर्या काकडे पराभूत वि शार्दुल खवले 3(6), 4(8), 12 वर्षाखालील मुली- पुर्वा भुजबळ वि.वि कौशिकी सामंथा 6-0, 12 वर्षाखालील मुले- अमोद सबनीस वि.वि अभिराम निलाखे 6-2, 14 वर्षाखालील मुली- मधुरीमा सावंत वि.वि रिजुल सिदनाळे 6-0, 14 वर्षाखालील मुले- अर्जुन अभ्यंकर वि.वि शौर्य राडे 6(8), 5(6), 16 वर्षाखालील मुली- मृणमयी भागवत पराभूत वि हृदया शहा 2-6, 16 वर्षाखालील मुले- इंद्रजीत बोराडे पराभूत वि सर्वेश बिरमाने 0-6, मिश्र दुहेरी- राघव अमिन/अन्या जेकब वि.वि आर्यन शहा/समिक्षा श्रॉफ 6-2, मिश्र दुहेरी- मृणमयी भागवत/इंद्रजीत बोराडे पराभूत वि हृदया शहा/ सर्वेश बिरमाने 1-6 )