पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने बांधकाम
परवानगी प्रक्रिया सुकर व पारदर्शक करण्यासाठी ‘संगणकीय बांधकाम परवानगी प्रणाली’
(Online Building Plan Approval System) पूर्णपणे कार्यन्वित करण्यात आली आहे.
ऑनलाईन प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यत बांधकाम परवानगी प्रक्रीयेसाठी
वास्तुविशारद, अभियंता, पर्यवेक्षक या २५० जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
संगणकीय बांधकाम परवानगी प्रणालीचा वापर हा सर्वांना हाताळण्ययोग्य (user Freindly)
आहे. बांधकाम परवानगीसाठी ७५ फाईल्स प्रक्रियेत आहेत. ५४ जणांनी आतापर्यंत ऑनलाईन
शुल्क भरले आहे. ऑनलाईन बांधकाम परवानगी पूर्णपणे ऑनलाईन आहे, यासाठी कोणतीही
मानवीय प्रक्रिया नाही. बांधकाम परवानगीची प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असून अगदी कमी
वेळेत ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली जात आहे. ऑनलाईन बांधकाम परवानगी प्रक्रियेचा
वापर सध्या रहिवाशी व औद्योगिक वापरासाठी केला जात आहे. लवकरच वाणिज्यिक वापरासाठी
ऑनलाईन प्रक्रिया विस्तारित केली जाणार आहे.
बांधकाम परवानगी नकाशे व बँक चलन हे डिजिटल स्वाक्षऱ्यांचा वापर करून केले जात आहेत.
तसेच नागरिकांना ई-मेल आणि मोबाईलवर माहिती दिली जात आहे. या प्रणालीमध्ये ‘कलर-
कोडींग स्कीम’चा वापर आहे, ज्यामुळे वास्तुविशारदांना नकाशे बनविणे अतिशय सोपे आहे.
OBPAS द्वारे सर्व चलन ऑनलाईन पद्धतीने भरता येत आहेत. पीएमआरडीएच्या अस्तित्वात
असलेला जमीन वापर (Existing Land Use) प्रणालीशी या नवीन बांधकाम परवानगी प्रणालीला
जोडण्यात आले आहे. या संगणकीय बांधकाम परवानगी प्रणालीकरीता www.pmrda-
obpas.com हे पोर्टल विकसित आहे.
मा. आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले की, “बांधकाम परवानगी ऑनलाईन प्रक्रीया जलद व
सुलभ आहे. सध्या ही प्रक्रिया पूर्णपणे user friendly आहे. या प्रणालीचा कोणताही लिखित
स्वरूपात वापर नाही. त्यासाठी संबधित नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करण्यास प्राधान्य द्यावे.