Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एफसी पुणे सिटी संघात क्रोएशियनचा मध्यरक्षक डॅमिर ग्रेगिक याचा समावेश

Date:

पुणे: राजेश वाधवान समूह आणि ह्रितिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने  मध्यरक्षक डॅमिर ग्रेगिक याला करारबध्द केले आहे. 2017-18या मौसमासाठी क्रोएशियनच्या डॅमिर ग्रेगिक हा इंडियन सुपर लीग मध्ये पहिल्यांदाच सहभागी होत आहे. 

एफसी पुणे सिटी संघात डॅमिर ग्रेगिक याचा समावेश केल्याची अधिकृत घोषणा एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी आज केली. मोडवेल म्हणाले की, स्लोव्हेनियामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून डॅमिर संघात सहभागी झाला आहे. तो अतिशय ताकदवान आणि आक्रमक खेळाडू असून त्याच्या संघातील समावेशामुळे संघाची ताकद वाढणार आहे. तसेच, चेंडू पास करण्यात आणि ताबा मिळविण्यात या दोन्हीमध्ये  त्याचा हातखंडा आहे. 

2010मध्ये दमिर याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात क्रोएशियनच्या प्रथम श्रेणी विभागांतील एनके कार्लोवक संघाकडून केली आणि त्यांनतर तो जर्मनच्या व्हीएफएल बौचम संघात सहभागी झाला. 2015पासून त्याने स्लोव्हेनियन प्रवलिगाकडून एनके रुदर वेलेंजे संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.  

यावेळी डॅमिर ग्रेगिक म्हणाला कि, भारतात येऊन इंडियन सुपर लीग स्पर्धेत एफसी पुणे सिटी संघाकडून खेळण्यास मी फार उत्सुक आहे. माझ्या व्यावसायिक कारकिर्दीत मी सर्वाधिक काळ युरोपमध्ये खेळला असल्यामुळे माझ्यासाठी हे एक नव्हे आव्हान असणार आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...