Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

संजय चोरडिया यांचा ‘बेस्ट सोशल मीडिया कॅम्पेन ॲवॉर्ड’ देऊन गौरव

Date:

पुणे : ‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन’ (एसईएफ) या धर्मादाय निधीची नोंदणी महाराष्ट्र सरकारच्या रजिस्ट्रार ऑफ सोसायटीकडे झाली आहे. ‘एसईएफ’अंतर्गत ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’ची स्थापना वर्ष १९९९ मध्ये कै. श्री. बन्सीलालजी चोरडिया व श्रीमती रतनबाईजी चोरडिया यांच्या आशीर्वादाने झाली.

सूर्यदत्ता परिवार आजवरच्या वाटचालीत विवीध विद्याशाखांतील शैक्षणिक संस्थांच्या गुच्छात बहरला आहे. यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, मीडिया अँड मास कम्युनिकेशन, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, रीटेल, आयटी एनेबल्ड सर्व्हिसेस, क्रिएटिव्ह आर्ट्स, व्होकेशनल, ॲडव्हान्स्ड स्टडीज, ज्युनिअर कॉलेज, सीबीएसई स्कूल, ब्युटी अँड वेलनेस, स्पोर्ट्स अँड फिटनेस, हेल्थ सायन्स, ग्लोबल फिनीशिंग स्कूल, रिसर्च सेंटर, कॉलेज ऑफ एज्युकेशन आदींचा समावेश आहे.

गेल्या दोन वर्षांत आपले कर्मचारी, विद्यार्थी व ‘इनोसर्व्ह’ या सहयोगींच्या मदतीने केलेल्या अविरत सोशल मार्केटिंगमुळे ‘सूर्यदत्ता ग्रुप’ला सोशल मीडियामध्ये मिळणाऱ्या लाईक्स सुमारे ३०० ते ४०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’ वर्षभर मूल्यवर्धित कार्यक्रम, सामाजिक जबाबदारी उपक्रम, औद्योगिक भेटी, शिक्षणसंबंधित व्हिडिओ, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना प्रेरणात्मक व मार्गदर्शन सत्रे देणारे डॉ. संजय चोरडिया यांचे व्हिडिओ, वर्तमानपत्रांची कात्रणे व इतर व्हिडिओज व पोस्ट्स, ब्लॉग्ज असा आशय फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, यूट्यूब अशा सोशल मीडिया साईट्सवर अपलोड करत असते.

यामागील हेतू विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची सर्वांगीण समृद्धी व व्यक्तीमत्त्व विकास घडवण्याचा आहे. यासाठी शिक्षण अधिष्ठात्यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कर्मचारी, विद्यार्थी व डिजीटल नॉलेज पार्टनर्सच्या मदतीने एक समर्पित संघ स्थापन करण्यात आल्याने त्याचा परिणाम रोज सोशल मीडिया प्रेक्षकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्यात दिसून आला आहे.

या कार्याची दखल घेऊन ‘एफएमए डिजीटल’ ही एज्युटेक डिजीटल कंपनी आणि ‘एएसएमए’ यांनी ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’ला नुकतेच ‘बेस्ट सोशल मीडिया कॅम्पेन ॲवॉर्ड’ देऊन गौरवले. पुण्यातील हयात हॉटेलमध्ये झालेल्या ‘एएसएमए ॲन्युअल कन्व्हेन्शन अँड ॲवॉर्ड्स २०१७’ या भव्य सोहळ्यात ‘ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन’चे (एआयसीटीई) उपाध्यक्ष श्री. एम. पी. पूनिया यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

सोशल मीडियाचा शिक्षण क्षेत्राशी झालेला खास संगम साजरा करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम झाला. ‘डिजीटल ट्रान्स्फॉर्मेशन ऑफ हायर एज्युकेशन : इमर्जिंग रोल ऑफ सोशल मीडिया’ ही त्याची संकल्पना होती. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व नामवंतांची प्रगती व योगदान यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी डॉ. एम. पी. पूनिया यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. त्यांच्यासाठी हा खरोखर अभिमानाचा क्षण होता.

सोशल साईट्सच्या प्रेक्षकांनी नियमित भेटी देऊन समूहाची प्रगती बघितल्याबद्दल सूर्यदत्ता ग्रुपतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या परिषदेला आयआयटींचे संचालक, आयआयएमचे प्राध्यापक, नामवंत सरकारी व खासगी बिझनेस स्कूल्स व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य, कुलपती/कुलगुरु उपस्थित होते. या संस्थांमध्ये सोशल मीडियाचा अंगीकार करुन त्यांचे विवीध पैलू शोधण्याचे सुप्त सामर्थ्य आहे. काही आघाडीचे शिक्षण तज्ज्ञ व उद्योजकही या परिषदेला उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...

नियमांचा भंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवा

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांची भूमिका : हिंजवडी भागातील नागरी समस्यांवर...