कल्याण -जेव्हा पासून मोदी सरकार आलेय तेव्हापासून बॉम्बस्फोट करण्याची हिंमत कोणी केली काय ? कॉंग्रेसच्या काळात किती स्फोट होत ? आणि कॉंग्रेस पाकिस्तानपुढे गिडगीडत कि नका हो असे करू .. आणि शांततेचे प्रतिक म्हणून कबुतर उडवून फोटो काढून घेत . त्या पाकिस्तानबद्दल नाहक भीती निर्माण करत कि त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे, अरे त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत …मोदी सरकार आल्यापासून होतात का बॉम्बस्फोट? असे सवाल करत नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस हे पाक धार्जिणे आणि मुस्लीम धार्जिणे असल्याचा जोरदार हल्लाबोल केला ,राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. भव्य व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नाकारली. तो व्हिडिओ सर्वांनी पाहिला का, असा सवाल बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते कल्याणमध्ये आयोजित सभेत बोलत होते.काँग्रेसच्या राजकुमाराकडून वीर सावरकरांबद्दल चार चांगले शब्द बोलून घ्यावे, असे आवाहन ही मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार गटाला केले. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विनंती केल्यामुळे राहुल गांधी सावरकरांबद्दल निवडणुकीचा काळात वाईट बोलत नसल्याचा दावा त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला नमस्कार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी कल्याण मध्ये आलो असल्याचे म्हटले आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती, या वेळी ते बोलत होते. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच गरीब जनता ही निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसात काय करणार? याची ब्लू प्रिंट तयार असल्याचा दावा मोदींनी केला आहे. मतदारांचे स्वप्न हाच मोदींचा संकल्प असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
भारतामध्ये पहिल्यांदाच नवा आत्मविश्वास दिसून येत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणातून भारत पहिल्यांदाच बुलंद आत्मविश्वासासोबत मोठे लक्ष साध्य करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांमध्ये कोणते काम करायचे, कोणते निर्णय घ्यायचे, यावर काम झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सरकार तयार झाल्यानंतर केवळ विजयाच्या माळा गळ्यात घालून फिरण्याचे काम केले नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आज मी जेवढी मेहनत करत आहे, तेवढीच मेहनत चार जून नंतर देखील करणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पुढील शंभर दिवसात सरकार काय करणार? याची ब्लू प्रिंट तयार करून आम्ही पुढे जात असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
मला एवढा आत्मविश्वास का आहे? असा प्रश्न लोक विचारतात. मात्र, माझ्या आत्मविश्वासाचा मुद्दा नाही तर जनता जनार्दनांच्या विश्वासाचा मुद्दा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशातील तरुणांकडे नवी कल्पकता, नवीन आयडिया आहे. प्रत्येक गोष्टीला नव्या पद्धतीने करण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. सध्या माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांच्यामुळे मी खूप प्रभावित झालो असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशातील युवकांना माझी वैयक्तिक विनंती किंवा आग्रह आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना देखील आवाहन केले. सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसात काय काम करायचे याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या शंभर दिवसात आणखी 25 दिवस वाढवण्याचा माझा विचार आहे. या 25 दिवसात काय करायला हवे, याचा सल्ला तरुणांनी आम्हाला पाठवावा. त्या 25 दिवसात ते काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.