भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र १७ , लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि रघुवंशी युवा मंच यांच्या सहकार्यांने कै. नथुराम उर्फ अण्णा कोंढरे व कै. सुलोचना नथुराम कोंढरे यांच्या स्मरणार्थ भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते . मोहंमदवाडी येथील ह. वि. देसाई नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी करण्यात आली . तसेच पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले .
या शिबिराचे उदघाटन नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्याहस्ते करण्यात आले . या शिबिरामध्ये ५७० नेत्रतपासणी , ५०० मोफत चष्मे वाटप व ५७ अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आले . तसेच आधार रक्तपेढीच्या सहकार्याने सुमारे ५० पिशव्या रक्त संकलित करून रक्तदान शिबीर घेण्यात आले .
यावेळी जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे कसबा विधानसभा मतदार संघाचे चिटणीस तेजेंद्र कोंढरे , भारतीय जनता पार्टीचे कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष नगरसेवक राजेश येनपुरे , सरचिटणीस प्रमोद कोंढरे , पालक संजयमामा देशमुख , भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडी पुणे शहर अध्यक्ष अरविंद कोठारी ,स्वीकृत नगरसेवक छगन बुलाखे , राजू परदेशी , रोहिणी नाईक , लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचे अध्यक्ष नितीन मेहता , नितीन ठक्कर , जयेश तन्ना , आशा ओसवाल , कल्पेश पटणी, रघुवंशी युवा संघाचे अध्यक्ष रवि बुधानी , भरत अजत , भावीन ठक्कर , जिग्नेश ठक्कर , रमेश ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते .
या शिबिरासाठी ह. वि. देसाई नेत्र रुग्णालयाचे डॉ महेश पवार ,डॉ अलका शिंदे , जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे कसबा विधानसभा मतदार संघाचे चिटणीस तेजेंद्र कोंढरे व जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले .
यावेळी पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले कि , आरोग्य शिबिराचा उपक्रम कौतकास्पद असून प्रभागातील प्रत्येक नगरसेवकाने आरोग्य शिबीर घेणे गरजेचे आहे . प्रत्येक नागरिकाने आपली आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज बनली आहे .