संशोधन व ग्राहकनिहाय आवश्यक दृष्टिकोन यांच्या मदतीने एचएनआय व अल्ट्रा-एचएनआय यांच्यासाठी टेलर-मेड संपत्ती व्यवस्थापन सल्ला व पर्याय
- भारतात 20 ठिकाणी 70 प्रायव्हेट बँकिंग स्पेशालिस्ट
- डेबिट, क्रेडिट व फॉरेक्स कार्ड याप्रमाणे वापरता येणारे विशेष 3-इन-1 मेटॅलिक कार्ड दाखल करणारी पहिली भारतीय बँक
मुंबई, अॅक्सिस बँकेने आज हाय व अल्ट्रा-हाय नेट-वर्थ श्रेणीतील ग्राहकांना सेवा देणारी बर्गंडी प्रायव्हेट ही खासगी बँकिंग सुविधा सुरू केल्याची घोषणा केली आहे.
मर्यादित वेळ व अमर्यादित गरजा असणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करणारी बर्गंडी प्रायव्हेट सुविधा ग्राहकांच्या संपत्ती व्यवस्थापन व कर्ज सुविधा, फॅमिली ऑफिस, इस्टेट नियोजन, रिअल इस्टेट व करविषयक सल्ला यासाठी संशोधनावर आधारित गुंतवणूक सल्ला या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी कस्टमाइज्ड सेवा देते.
प्रायव्हेट बँकिंग हे प्रामुख्याने नॉन-बँक एंटीटींचे क्षेत्र समजले जाते, जसे एनबीएफसी, मल्टि-फॅमिली ऑफिसेस व बुटिक वेल्थ-मॅनेजमेंट फर्म. परंतु, “वन अॅक्सिस” दृष्टिकोनाद्वारे, बर्गंडी प्रायव्हेट ग्राहकांच्या संपत्तीविषयक विशिष्ट व आधुनिक गरजा पूर्ण करण्यासाठी अॅक्सिस समूहाच्या सर्व क्षमता एकत्र आणणार आहे. केवळ बँकेच्याच नाही, तर बँकेच्या अॅक्सिस सिक्युरिटीज, अॅक्सिस कॅपिटल, अॅक्सिस म्युच्युअल फंड व अॅक्सिस फायनान्स या उपकंपन्यांच्या सेवांच्या मार्फत या खास सेवा एचएनआय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणार आहे. तसेच, बाह्य तज्ज्ञांबरोबर भागीदारीही करणार आहे.
2014 मध्ये, अॅक्सिस बँकेने ‘बर्गंडी’ हा संपत्ती व्यवस्थापन व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय आता देशातील एक आघाडीचा संपत्ती व्यवस्थापन फ्रेंचाईजी ठरला आहे. गेल्या 5 वर्षांत, अॅक्सिस बँकेने 1 लाखांहून अधिक कुटुंबांचा विश्वास संपादित केला आहे. या कौशल्याच्या व अनुभवाच्या मदतीने, बँकेने एचएनआय/अल्ट्रा-एचएनआय श्रेणीतील सेवांच्या बाबतीतील कमतरता व बाजारातील संधी समजून घेण्यासाठी व त्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक महिने संशोधन केले आहे आणि त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी ‘बर्गंडी प्रायव्हेट’ ही सेवा दाखल केली आहे.
20 ठिकाणच्या 70 प्रायव्हेट बँकिंग स्पेशालिस्टच्या टीमच्या मदतीने, ग्राहकांना अपेक्षित असणारी विशिष्ट सेवा देण्यासाठी ‘बर्गंडी प्रायव्हेट’ ही सुविधा अॅक्सिस समूहाच्या संशोधन क्षमतांचा आणि कौशल्यांचा लाभ घेणार आहे.
अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी यांनी सांगितले, “भारतामध्ये सरकार अर्थव्यवस्था औपचारिक करण्यासाठी आणि व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी प्रयत्न करत असताना, उद्योजकता वाढते आहे आणि हाय नेट-वर्थ व्यक्ती ही श्रेणी वाढते आहे. अर्थव्यवस्था 5 ट्रिलिअन डॉलरच्या दिशेने वाटचाल करत असताना, एचएनआयच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची अपेक्षा आहे. ही वाढ केवळ मेट्रो शहरांतच नाही, तर टिअर 2 व 3 शहरांतही दिसून येणार आहे. बर्गंडी प्रायव्हेट सुविधेद्वारे आम्ही विशेष, कस्टमाइज्ड सेवेच्या मदतीने बाजारातील ही प्रचंड संधी व तफावत भरून काढण्याचे नियोजन करत आहोत आणि मर्यादित वेळ व अमर्यादित गरजा असणाऱ्या लोकांना सेवा देणार आहोत.”
अॅक्सिस बँकेने बर्गंडी प्रायव्हेट ग्राहकांसाठी तयार केलेले विशेष उत्पादनही जाहीर केले. हे उत्पादन स्मार्ट मेटल कार्डच्या स्वरूपामध्ये असून त्यामध्ये डेबिट, क्रेडिट व मल्टि-करन्सी कार्डाची वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. 3-इन-1 बर्गंडी प्रायव्हेटमुळे ग्राहकांना भारतात व परदेशात असताना सुरळितपणे आर्थिक व्यवहार करण्यास मदत होणार आहे.
अॅक्सिस बँकेचे रिटेल बँकिंगचे कार्यकारी संचालक प्रलय मोंडल यांनी सांगितले, “एचएनआयना बँकरकडून अपेक्षित असणाऱ्या सर्व सेवा ‘बर्गंडी प्रायव्हेट’ सुविधा देणार आहे. ग्राहकांना सर्व सेवा सुलभपणे मिळतील याची काळजी घेणे, त्यांना दर्जेदार अनुभव देण्याबरोबरच त्यांना सोयीस्कर ठरेल अशा प्रकारे सेवा देणे, हे नेहमीच आमचे उद्दिष्ट राहिले आहे आणि या श्रेणीसाठी ही सुविधा व 3-इन-1 बर्गंडी प्रायव्हेट मेटल कार्ड दाखल करून आम्ही आमचे हे प्रयत्न अधोरेखित केले आहेत.”
देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेली अॅक्सिस बँक बर्गंडी प्रायव्हेट ही सुविधा देशातील महत्त्वाच्या ठिकाणच्या एचएनआय व यूएचएनआय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज आहे.
अॅक्सिस बँकेविषयी
अॅक्सिस बँक ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक आहे. अॅक्सिस बँकेतर्फे मोठ्या व मध्यम कंपन्या, एसएमई, कृषी व रिटेल व्यवसाय अशा सर्व श्रेणीतील ग्राहकांना संपूर्ण सेवा दिल्या जातात. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत, देशभरातील 4,284 देशांतर्गत शाखा (विस्तार केंद्रांसहित) व 12,191 एटीएम असलेली अॅक्सिस बँक 2,453 शहरांत कार्यरत असून यामुळे बँकेला विविध उत्पादने व सेवा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवणे शक्य होते.