“यंग कम्युनिकेटर्स क्लब’ च्या अध्यक्षपदी रिदम सुधीर वाघोलीकर
पुणे :
“पब्लिक रिलेशन्स् कौन्सिल ऑफ इंडिया’ने स्थापन केलेल्या “यंग कम्युनिकेटर्स क्लब’च्या अध्यक्षपदी रिदम सुधीर वाघोलीकर यांची निवड करण्यात आली आहे. “पब्लिक रिलेशन्स् कौन्सिल ऑफ इंडिया’चे राष्ट्रीय सहसचिव अविनाश गवई यांनी ही नियुक्ती केली. वैकुंठभाई मेहता सहकार प्रशिक्षण राष्ट्रीय संस्थेत झालेल्या कार्यक्रमात प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी)चे संचालक प्रशांत पाठराबे यांच्या हस्ते वाघोलीकर यांचा सत्कार करण्यात आला.
युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी संवाद, जनसंपर्काचे महत्त्व सांगण्यासाठी उपक्रमांचे आयोजन महाविद्यालय स्तरावर करणे हे “यंग कम्युनिकेटर्स क्लब’ चे उद्दिष्ट आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.