सकारात्मक प्रतिमा निर्मितीसाठी जनसंपर्क महत्वाचा :प्रशांत पाठराबे

Date:

पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया ‘ च्या परिसंवादाला चांगला प्रतिसाद 
पुणे :
‘ सरकारी कामापासून सार्वजनिक क्षेत्रातील उद्दिष्टाच्या यशासाठी सकारात्मक प्रतिमा निर्माण होणे गरजेचे असून त्यासाठी संवाद आणि जनसंपर्क उपयोगात आणावा ‘ असा सल्ला प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी ) चे संचालक प्रशांत पाठराबे यांनी आज दिला
‘सार्वजनिक जीवनातील संवाद आणि जनसंपर्काचे महत्व ‘ या विषयावरील परिसंवादात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते .  ‘ पब्लिक रिलेशन्स  कौन्सिल ऑफ इंडिया ‘ ने या परिसंवादाचे आयोजन बुधवारी दुपारी  पुण्यातील   वैकुंठ भाई मेहता सहकार प्रशिक्षण राष्ट्रीय संस्थेत केले होते .
 या परिसंवादात प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी ) चे संचालक प्रशांत पाठराबे ,’ पब्लिक रिलेशन्स  कौन्सिल ऑफ इंडिया ‘ चे राष्ट्रीय सहसचिव अविनाश गवई , वैकुंठ भाई मेहता सहकार प्रशिक्षण राष्ट्रीय संस्थेचे  संचालक प्रा . संजीव पट्जोशी ,बिझनेस standard चे व्यवस्थापक (विपणन )  सुमेध गुप्ते ,’ यंग कम्म्युनिकेटर्स क्लब ‘ चे अध्यक्ष  रिदम वाघोलीकर सहभागी झाले होते
प्रशांत पाठराबे म्हणाले ,’ प्रभावी संवादासाठी सर्वाना कळणारे सोपे शब्द वापरले पाहिजेत . शहरापेक्षा ग्रामीण भागात संवाद साधणे आणि जनसंपर्क प्रस्थापित करणे कठीण असते आणि तेथे जनसंपर्क सल्लागार उपलब्ध होतीलच असे नाही ,अशा वेळी स्वतःच संवाद आणि जनसंपर्क वाढविणे आवश्यक असते . सरकारी कामापासून सार्वजनिक क्षेत्रातील उद्दिष्टाच्या यशासाठी सकारात्मक प्रतिमा निर्माण होणे गरजेचे असून त्यासाठी संवाद आणि जनसंपर्क उपयोगात आणावा . जनसंपर्क क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींना भेटण्याची आवड असली पाहिजे
प्रा . संजीव पटजोशी म्हणाले ,’आपल्याला जी भाषा येते ,त्याच भाषेत प्रभावीपणे व्यक्त झाले पाहिजे ,इंग्रजी भाषेचा न्यूनगंड बाळगता कामा नये . यशस्वी होण्यासाठी ऐकण्याची कलाही महत्वाची आहे . ‘ एसेमेस द्वारे संवाद साधताना भाषेची मोडतोड होत असल्याची चिंता व्यक्त करून पट्जोशी यांनी डिक्शनरी वापरण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला
सुमेध गुप्ते म्हणाले ,’प्रत्येक ठिकाणी चांगल्या कामासाठी चांगला संवाद उपयोगी पडतो . सध्याच्या काळात अनेक कंपन्या आक्रमक जाहिराती करून लक्ष वेधत  असल्या तरी आपण वयक्तिक पातळीवर चांगल्या संवादावरच भर दिला पाहिजे . संवादातील सातत्य आपल्याला यश मिळवून देते ‘
अविनाश गवई यांनी प्रास्ताविक केले .
संस्थेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर छापे टाकले?”; तुकाराम मुंढेंच्या FDAला हायकोर्टाचा सवाल

मंत्रालयातील कँटीन ‘९८ टक्के स्वच्छ’ असल्याचा दावा प्रत्यक्ष पाहणीत...

‘ही पौर्णिमा स्वरांची’मध्ये अजरामर गीतांनी जागविल्या सांगीतिक स्मृती

हिंदू महासभा आयोजित आणि स्वच्छंद पुणे प्रस्तुत कार्यक्रमात रसिकांनी...

पुण्यात जोरदार, दमदार पाऊस; चारही धरणे ९६.४३ टक्के भरली, मुठा नदीला पूर

खडकवासला धरणसाखळीत २८.११ टीएमसी पाणीसाठा; गतवर्षापेक्षा २.६३ टीएमसी अधिक मुठा...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान थेऊर येथे संपन्न

सुमारे दीड हजार लाभार्थ्यांना लाभ पुणे, दि.३१: राज्य शासनाच्या महसूल...