Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एसबीआय चा व्यापार मंडईतल्या ‘त्या ‘ दुकानदाराप्रमाणे ?

Date:

पुणे : बुधवार पेठेत अगर मंडईत एखाद्या बोळातील दुकानदारांकडून कधी जीर्ण नोटा तुम्ही बदलून घेतल्या असतील तर त्या बदलून देताना तो दुकानदार काही कमिशन घेत असे ..व त्यावर आपला उदरनिर्वाह करीत असत हि गोष्ट अनेकांना ठावूक असेल आता असाच व्यापार भारतीय स्टेट बँकेवर जणू करण्याची वेळ आली आहे . एस बी आय पुन्हा एकदा सेवा शुल्कात वाढ करणार आहे. त्यामुळे  बॅंकचे व्यवहार महागणार आहेत. यामुळे विविध सेवांसाठी खातेदाराचा खिसा रिकामा होणार आहे.

१ जूनपासून एसबीआय नवीन नियम लागू करणार आहे. या नियमानुसार, जीर्ण तसेच फाटलेल्या नोटा बँकेकडून बदलून घेणाऱ्या ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार आहे. त्याचसोबत बचत खात्यातून पैसे काढणाऱ्या खातेदारांकडूनही शुल्क आकारणी केली जाणार आहे. चार व्यवहारानंतर ५० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच मर्यादेपेक्षा अधिक पैसे काढल्यास प्रत्येक व्यपहारावर २० रुपये घ्यावे लागणार आहेत. तसेच त्यावर सेवा करही असणार आहे.

तसेच खराब किंवा फाटलेल्या नोटा बदलल्यास यासाठी आता शुल्क आकारले जाणार आहे.  फाटलेल्या तसेच खराब झालेल्या नोटा एसबीआयच्या कोणत्याही शाखेतून बदलल्यास २ ते ५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

२० पेक्षा जास्त नोटा किंवा ५ हजार रुपये मूल्य असलेल्या नोटा बॅंकेतून बदलल्यास संबंधित शुल्क आकारण्यात येईल. सेवाशुल्क वेगळे द्यावे लागेल.
२० पेक्षा कमी नोटा आणि ५ हजार रुपये मूल्य नसलेल्या नोटा बदलल्यास कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

एटीएममधून अतिरिक्त व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहारावर १० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच सेवा कर हा वेगळा असणार आहे. तसेच बॅंक व्यतिरिक्त दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून अतिरिक्त व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहारावर २० रुपये आकारण्यात येणार आहेत. यावरही सेवा कर असणार आहे. त्यामुळे ग्राहकाला आता एसबीआयची सेवा महाग ठरणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...