पुणे-नव्याने महापालिकेत समाविष्ट गाव भेटी दरम्यान आज वाघोली ग्रामपंचायत माध्यमातून विविध विकासकामांचे लोकार्पण भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते संपन्न झाले.
वाघोली मधील वॉर्ड क्र ४ संत तुकाराम नगर भागात ४ कोटी रुपयांच्या निधीतून अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत.अनिल सातव व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सार्वजनिक जागांवर नागरिकांच्या हिताचे प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे मुळीक यांनी या वेळी सांगितले.वाघोली गाव व परिसराच्या विकासासाठी व समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले.
यावेळी माझ्यासह माऊली आबा कटके, दादासाहेब सातव, संतोष खांदवे, वसुंधराताई उबाळे, कविताताई दळवी,मिनाकाकी सातव, अनिल सातव, रावसाहेब राखपसरे, महेंद्र भाडळे,शिवदास उबाळे, रामकृष्ण सातव,जयप्रकाश सातव, संजय सातव, आदित्य खांदवे,गणेश सातव, विजय जाचक, गाडे यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक उपस्थित होते