पुणे – नाते बहिण – भावाचे ,प्रेम आणि विश्वासाचे ,बंध हे आपुलकीने जपण्याचे ही म्हण सार्थ करीत समाजाशी आपणही एकरूप आहोत, याचा सुखद अनुभव नांदेड फाटा येथील साई संस्थेच्या 40 अंध महिलांनी घेतला. निमित्त होते अमित बागुल आणि मित्र परिवारातर्फे अंध महिला भगिनीसमवेत अनोख्या भाऊबीज सोहळ्याचे. या भाऊबीजमुळे ‘त्यांच्या’ आयुष्यात दाटलेला काळोख मात्र काही क्षण नाहीसा होऊन प्रसन्नतेचा, उत्साहाचा भाव ‘त्यांच्या ‘ चेहऱ्यावर प्रकाशमय झाला होता.एरवी आपल्या अंधकारमय जीवनावर मात करीत जगण्यासाठी धडपड करणाऱ्या या अंध महिलांना आपली काळजी घेणारे, कुटुंबाप्रमाणे मानणारे कुणीतरी आहेत, या विचारानेच त्यांच्या जगण्याची, आयुष्यातील काळोखावर मात करण्याची उमेद या अनोख्या भाऊबीज सोहळ्यातून वृद्धिंगत झाल्याचे आणि अनेक महिलांच्या प्रतिक्रियांतून दिसून आले. तर अमित बागुल आणि मित्रपरिवाराने या अनोख्या भाऊबीज सोहळ्याचे नियोजन केले. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत हा शब्द औक्षण करताना प्रत्येकजण देत होता आणि आमचे जीवन तुमच्यासारखे भाऊ असल्याने कधीच अंधकारमय नाही अशा भावना या भगिणींकडून व्यक्त होत होत्या. गाण्यांच्या भेंड्या आणि गप्पांमधून हा सोहळा आणखीनच रंगत गेला. याप्रसंगी ,अमित बागुल इम्तियाज तांबोळी, अभिषेक बागुल,, महेश ढवळे,संतोष पवार , बाबासाहेब पोळके, समीर शिंदे ,भरत तेलंग,धनंजय कांबळे , यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते