दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा:ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची प्रतिक्रिया

Date:

पुणे पुस्तक महोत्सवाच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यालयाचे उद्घाटन

पुणे: देशात दिल्लीचा पुस्तक मेळा श्रेष्ठ मानला जायचा मात्र, पुणे पुस्तक महोत्सवाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही उक्ती पुणेकरांनी वाचन प्रेमाबाबत सार्थ ठरवली आहे. येत्या एक ते दोन वर्षात पुणे पुस्तक महोत्सव दिल्लीच्या पुस्तक मेळ्याला मागे टाकेल, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शुक्रवारी काढले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी), पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे चौथे पर्व १२ ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगणार आहे. वाचन संस्कृतीचा प्रचार-प्रसार करणाऱ्या या महोत्सवाच्या महाविद्यालयातील मुख्य कार्यालयाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, ज्ञानप्रसाद ग्लोबल विद्यापीठाचे प्र-कुलपती सोमनाथ पाटील, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, महोत्सव समितीचे सदस्य प्रसेनजीत फडणवीस, डॉ. आनंद काटीकर, बागेश्री मंठाळकर, मुकुल मारणे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘पुणे या ग्रंथप्रेमी शहराला एवढ्या मोठ्या महोत्सवाचा घाट घालण्याचा निश्चितच अधिकार आहे. येथील लोक ग्रंथ आणि ग्रंथकारांवर भरभरून प्रेम करतात. या पुण्यवान भूमीत ग्रंथरथ हाती घेतला असून, त्याला यश येवो. पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांचा महोत्सव आहे, या भावनेतून पुणेकर सहभागी होतात, ही बाब कौतुकास्पद आहे.आता लोक वाचनापासून दुरावत आहेत. रेल्वे, बस प्रवासात लोकांच्या हाती पुस्तक दिसत नाही. मात्र, पुणे पुस्तक महोत्सवामुळे वाचन संस्कृती पुन्हा रुजत असून, डिजिटल युगात ज्ञान आणि संशोधनाला पर्याय नाही.’

डॉ. गोसावी म्हणाले, ‘पुणे पुस्तक महोत्सवामुळे पुण्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. वाचन संस्कृती जपणारे शहर म्हणून नवी ओळख निर्माण होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थी, पालक, संशोधक , प्राध्यापक आणि पुणेकर एकत्र येत आहे. त्यांना या महोत्सवातून मोठ्या प्रमाणावर ज्ञान मिळत आहे. वाचन संस्कृती वाढत असल्याने, डिजिटल युगातून आपण परत येतोय, याचे कौतुक आहे. पुस्तकाचे आणि वाचनाचे महत्त्व वाढत आहे.’

पांडे म्हणाले,’पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने दिवाळीत दिवे प्रज्वलित करून, आम्ही दीपोत्सव ते पुस्तकोत्सवची सुरुवात केली. पुस्तक महोत्सव हा इव्हेंट नसून, वाचनाची चळवळ आहे. वाचन संस्कृतीला पुढे नेणारा उपक्रम आहे. देशभरात एनबीटीच्या माध्यमातून विविध शहरांमध्ये पुस्तक महोत्सव होतात. मात्र, पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे.या उपक्रमात लोकसहभाग महत्त्वाचा असून, त्यामुळे हा यशस्वी होत आहे. लोकसहभागामुळे पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांचा ठेवा झाला आहे. पुढील २१ डिसेंबरपर्यंत या कार्यालयाच्या माध्यमातून महोत्सव यशस्वी आणि व्यापक करण्यासाठी आपला एकत्रित प्रयत्न करायचे आहेत. डॉ. काटिकर यांनी आभार मानले. डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्यनगरच्या पुनर्विकासात जुन्या वृक्षसंपदेचा बळी? पुण्याचा श्वास कोंडत असताना झाडांवर घाव कशासाठी?

तीन मजल्यांच्या जागी अठरा-वीस मजल्यांच्या इमारतींची चर्चा; जुन्या ८०३...

पुण्यातील रस्त्यांची रुंदी कमी करण्यास विरोध; निलेश निकम यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र!

विकास आराखड्यात १४३ फेरबदल; त्यातील ८४ रस्त्यांशी संबंधित! भविष्यातील...

महावितरण पुणे परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी पंकज तगलपल्लेवार रुजू

पुणे, दि. १३ नोव्हेंबर २०२६ : महावितरणच्या पुणे परिमंडलाच्या...