नरेंद्र मोदी व भाजपाने पंडित नेहरुंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी या देशात शेवटपर्यंत नेहरुच राहतील : खा. संजय राऊत

Date:

पंडित जवाहलाल नेहरु हे भारताला पंतप्रधान लाभले ही अभिमानाची बाब, नेहरुंच्या मार्गानेच यापुढेही वाटचाल करु: हर्षवर्धन सपकाळ

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवनमध्ये ‘भारत भाग्यविधाता’ विशेष कार्यक्रम संपन्न.

मुंबई, दि. १३ नोव्हेंबर २६

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासारखे दुरदृष्टीचे व वैज्ञानिक विचाराचे नेतृत्व लाभले. पंडित नेहरु यांना फाऊंडर ऑफ द नेशन म्हणतात. प्रत्येक पंतप्रधानाची एक स्वतंत्र ओळख आहे. लाल बहाद्दुर शास्त्री यांना मूर्ती लहान किर्ती महान म्हणून ओळखले जाते, इंदिरा गांधी यांना आयर्न लेडी म्हणून ओळखतात, राजीव गांधी यांना माहिती तंत्रज्ञानाचे प्रणेते म्हणून ओळखतात, अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे सभ्य व सुसंस्कृत नेतृत्व म्हणून पाहिले जाते. डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाची अर्थव्यवस्था भक्कम केली, वनहक्क कायदा, माहिती अधिकार कायदा, अन्न सुरक्षा कायदा दिला, पण आताच्या पंतप्रधानांची ओळख काय? असा प्रश्न विचारून पंडित नेहरु हे भारताला पंतप्रधान लाभले ही अभिमानाची बाब आहे आणि त्याच मार्गाने आपण यापुढेही वाटचाल करु, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘भारत भाग्यविधाता’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रोजगार व स्वयंरोजगार विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक भवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना खासदार संजय राऊत, माजी खासदार कुमार केतकर, काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे, विश्वास उटगी, नाटक व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन यांच्यासह कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीच्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरु ११ वर्षे तरुंगात होते, या काळात त्यांनी विपुल साहित्य लेखन केले. डिस्कव्हरी ऑफ इंडिया, वर्ल्ड हिस्ट्री, या प्रस्तकांचे लेखन त्यांनी केले. नेहरु साहित्यिक होते, त्यांनी आत्मचरित्रही लिहिले. देश स्वतंत्र झाला त्यावेळी पंडित नेहरु यांनी देशाला १९६ कोटी रुपये दान दिले. नेहरुंनी राष्ट्र निर्माण केले म्हणून त्यांना फाऊंडर ऑफ नेशन म्हणतात. आज आपल्या देशाची जी प्रगती झालेली आहे त्याचा पाया नेहरु यांनी रचला आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याकडे प्रचंड बहुमत होते तरीही ते मनमानीपणे वागले नाहीत, त्यांच्याकडे वैचारिक प्रगल्भता होती. पंडित नेहरुंनी कुळ कायदा आणला, भूसुधारणेचे कायदे आणले, सर्वसामान्य माणूस मालक झाला पाहिजे यासाठी त्यांनी काम केले असेही सपकाळ म्हणाले..

शिवसेना खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले की, नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने पंडित जवाहलाल नेहरुंचे कितीही मूर्तीभंजन केले तर तरी या देशात शेवटपर्यंत नेहरुच राहतील. आज राष्ट्रीय एकात्मता व व्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात बोलले जाते पण पंडित नेहरु हे व्यक्ती स्वातंत्र्यांचे खरे प्रणेते आहेत. नेहरुंवर टीका केली तरी ते सहन करत, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांच्या घरावर त्यांनी ईडी, सीबीआयच्या धाडी टाकल्या नाहीत. व्यंगचित्रकार शंकर यांनी एकदा पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना गाढव दाखवले पण त्यांच्यावरही नेहरु यांनी कारवाई केली नाही. आज जर पंतप्रधानांचे असे कोणी व्यंगचित्र काढले तर त्याची नोकरी जाईल, त्याच्यावर कारवाई होईल. जवाहरलाल नेहरु हे धर्मनिरपेक्ष नेते होते. नेहरूंनी भाकरा-नानगल सारखी मोठी धरणे बांधली, आयआयटी संस्था उभ्या केल्या, अणु ऊर्जा केंद्र उभारले. देश वैज्ञानिक मार्गाने पुढे जाईल असा नेहरुंचा प्रयत्न होता. नेहरु जगाचे नेते होते, नेहरुंनी स्वतःला कधी दैवी अवतार मानले नाही. जे आपल्या विचाराचे नाहीत त्यांनाही नेहरुंनी मंत्रिमंडळात स्थान दिले, असा विचार आज कोणी करत नाही. जवाहरलाल नेहरुंनी जगाला एक विचार दिला आहे. नेहरु सारख्या व्यक्ती फार कमी जन्माला येतात. जगा आणि जगा द्या, हा नेहरुंचा मंत्र होता आणि नेहरुंच्या विचारानेच हा देश पुढे जाईल, असेही राऊत म्हणाले.

माजी खासदार कुमार केतकर यावेळी म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जागतिक दृष्टीकोन पुन्हा आत्मसात करण्याची गरज आहे. आज जगात युद्धाची परिस्थिती आहे, रशिया-युक्रेन युद्ध, इराण युद्ध सुरु आहे, इस्त्रायल नरसंहार करत आहे. पंडित नेहरु जर आज असते तर त्यांनी या युद्धात मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित केली असती. नेहरु जेंव्हा तुरुंगात होते त्यावेळीच त्यांनी लोकशाहीची बिजे रोवली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात लोकशाही कशी स्थापन करता येईल हाच विचार त्यांनी केला होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार असेल असे पंडित नेहरु यांनी १९४७ सालीच घोषित केले होते. अमेरिकेत १९६८ पर्यंत कृष्णवर्णीय लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता तर इंग्लंडमध्येही अनेक वर्षे महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्वांना मतदानाचा अधिकार देणारा भारत जगातील एकमेव देश आहे. जवाहरलाल नेहरुंचा दृष्टीकोन वैश्विक होता, त्यांचा विचार आपण अंगिकारला पाहिजे, असेही कुमार केतकर म्हणाले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्यनगरच्या पुनर्विकासात जुन्या वृक्षसंपदेचा बळी? पुण्याचा श्वास कोंडत असताना झाडांवर घाव कशासाठी?

तीन मजल्यांच्या जागी अठरा-वीस मजल्यांच्या इमारतींची चर्चा; जुन्या ८०३...

दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा:ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे पुस्तक महोत्सवाच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यालयाचे उद्घाटन पुणे: देशात दिल्लीचा...

पुण्यातील रस्त्यांची रुंदी कमी करण्यास विरोध; निलेश निकम यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र!

विकास आराखड्यात १४३ फेरबदल; त्यातील ८४ रस्त्यांशी संबंधित! भविष्यातील...