‘श्री कृष्ण मित्र मंडळ ट्रस्ट’च्या वतीने जन्माष्टमी उत्सवातून ‘लेक वाचवा, लेक वाढवा’ संदेश
पुणे :
श्री कृष्ण मित्र मंडळ ट्रस्ट वडगाव बु.॥ च्या वतीने जन्माष्टमी उत्सवानिमित्त सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वडगाव बु. ॥ येथील ‘सर्वेशा सेवा संघ निराधार -निराश्रित बालकाश्रम’ मधील अनाथ गोपाळांना खाऊ, वह्या व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. तसेच या उत्सवात घेण्यात आलेल्या ‘वहिनी पुन्हा एकदा होम मिनिस्टर’ कार्यक्रमाद्वारे ‘लेक वाचवा लेक वाढवा’ हा संदेश देण्यात आला.
यावेळी हर्षल झगडे, युवराज झगडे, गिरीश झगडे, चंदन कड, संतोष हनमघर, रणजितसिंह जगताप, अभिषेक कवडे, धनंजय पाटील, सागर शिंदे, गणेश पवार, दीपक गाढवे उपस्थित होते.
मंडळाच्यावतीने घेण्यात आलेला अनाथ बाळगोपाळांना खाऊ वाटप हा उपक्रम स्व. विक्रांत कुदळे व स्व. मोहिनी कुदळे स्मरणार्थ राबविण्यात आला. तर स्व. विजयशेठ मिरघे यांच्या स्मरणार्थ ‘वहिनी पुन्हा एकदा होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम घेण्यात आला. रमेश परळीकर यांनी हा कार्यक्रम सादर केला. वडगाव बु.॥ मधील असंख्य महिला कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. जन्माष्टमीनिमित्त कृष्ण जन्म साजरा कऱण्यात आला. यावेळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील युवकांच्या दहिहंडीचे आयोजन करण्यात आले.