पुणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार शेखर गायकवाड यांनी स्वीकारला

Date:

पुणे- महापालिकेचे आयुक्त म्हणून शेखर गायकवाड यांनी पुणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.

पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह 20 सनदी अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. येत्या 24 जानेवारीला महापालिकेचे अंदाजपत्रक सादर होत असताना आयुक्त राव हे किमान तोपर्यंत पदभार ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु राज्य शासनाच्या आदेशानुसार राव यांनी पदभार सोडण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी सव्वा वाजता नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, रुबल अग्रवाल, उपायुक्त राजेंद्र मुठे उपस्थित होते.

पालिकेचे 2020 – 22 चे अंदाजपत्रक तयार असून नवीन आयुक्तच ते सादर करतील हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आज कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासंदर्भात होणारी विशेष समितीची बैठक शुक्रवार पर्यंत पुढे ढकलण्यात आली. तसेच आंबील ओढा पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठीचीही बैठक शुक्रवार पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

पुणे महापालिकेत कामाचा चांगला अनुभव मिळाला. थेट नागरिकांशी संपर्क होत असल्याने समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. पुणेकर आणि सभागृहातील सदस्य, अधिकारी, कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभले असे सौरभ राव यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नागरिकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा-महापौरांनी ऊर्जामंत्र्यांना घातले साकडे

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका...

मोदी सरकारला पहिला धक्का! महिला आरक्षण विधेयक नामंजूर; लोकसभेत गदारोळ

महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक 54 मतांनी पडले:बाजूने 298, विरोधात...

”शी कॅन अँड शी विल” उपक्रमातून पुण्यातील महिला बॉक्सर्सना नवी झेप

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ :महिला सक्षमीकरण आणि क्रीडा...

होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली..

तेहरान: इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली करण्याची...