- पीव्हीपीएल पुणे व बारामतीमधील १००० स्थलांतरित कामगारांना मासिक रेशन किट्सचा पुरवठा करत आहे
- पीव्हीपीएलकडून बारामतीमध्ये आयसोलेशन केंद्राची उभारणी, तसेच पुण्याच्या सरकारी हॉस्पिटलला पायाभूत सुविधांचा पुरवठा
पुणे, १७ एप्रिल २०२०: देशभरात पसरत असलेल्या जागतिक कोरोनाव्हायरस महामारी संकटाच्या विरोधातील लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. (पीव्हीपीएल) या दुचाकी विभागातील युरोपियन अग्रणी कंपनी, इटालियन पियाजिओ ग्रुपची १०० टक्के उपकंपनी आणि भारताच्या लहान व्यावसायिक वाहनांच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने घोषणा केली आहे की, ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्थानिक प्रशासन व समुदायांना कोविड-१९ विरोधात लढण्यामध्ये साह्य करणार आहेत.
एक जबाबदार कॉर्पोरेट सामाजिक नागरिक म्हणून पीव्हीपीएल जवळपास १००० स्थलांतरित कामगारांना महिनाभर आहार मिळण्याच्या खात्रीसाठी रेशन किट्सचा मोफतपणे पुरवठा करत आहे. कंपनीने बारामती एमआयडीसी क्षेत्रामधील स्थलांतरित कामगारांना वाटप करण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयाकडे रेशन किट्सचा पुरवठा केला आहे. पीव्हीपीएलने एनजीओ ‘न्यू व्हिजन’सोबत देखील सहयोग जोडला आहे आणि या सहयोगाच्या माध्यमातून पुण्यातील स्थलांतरित बांधकाम कामगारांना रेशन किट्सचे वाटप केले आहे.
आरोग्य कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोविड-१९ विरोधात कसे लढावे यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी पीव्हीपीएल एनजीओ ‘युनायटेड वे मुंबई’सोबत सहयोगाने पुण्याच्या ससून सरकारी हॉस्पिटलला पायाभूत सुविधांसह साह्य करत आहे. या उपक्रमांतर्गत पीव्हीपीएल पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्स देत आहे आणि हॉस्पिटलमध्ये सॅनिटायझेशन इन्फ्रास्ट्रक्चर स्थापित करत आहे. या उपक्रमांतर्गत रूग्ण व अभ्यागतांना या विषाणूशी कशाप्रकारे लढा द्यावा, यासंदर्भात देखील बहुमूल्य मार्गदर्शन करत आहे.
पीव्हीपीएलचा कारखाना बारामतीमध्ये असल्यामुळे बारामतीच्या स्थानिक सरकारी अधिका-यांसोबत सहयोगाने कंपनी काम करत आहे आणि त्यांना कोरोनाव्हायरस महामारीविरोधात लढण्यामध्ये साह्य करत आहे. कंपनी बारामती गव्हर्नमेण्ट हॉस्पिटलच्या विनंतीनुसार आयसोलेशन सेंटर स्थापित करत आहे. पीव्हीपीएलने आयसोलेशन सेंटरसाठी आवश्यक असलेल्या ईसीजी मशिन्स, आयसीवाय बेड्स, पल्स ऑक्सिमीटर आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्स सारखी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यास देखील सुरूवात केली आहे.
पियाजिओ वेईकल्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डिएगो ग्राफी म्हणाले, ”या अनपेक्षित संकटाच्या काळामध्ये आपण आपला निरंतन पाठिंबा देत सरकारला साह्य केले पाहिजे. या संकटामध्ये एक समुदाय म्हणून आपणा सर्वांकडून सहकार्य व पाठिंब्याची गरज आहे. आम्हाला या कठीण काळामध्ये आवश्यक मालांची ने-आण करण्याचे कार्य करणा-या आमच्या आपे’ तीनचाकी ग्राहक समुदायांचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. सामाजिकदृष्ट्या एक जबाबदार कंपनी म्हणून आम्ही विविध बचाव आणि प्रतिबंधात्मक कार्यांमध्ये स्थानिक प्रशासनांना साह्य करत समुदाय व लोकांसाठी आमच्यापरीने सर्वोत्तम कामगिरी करतच राहू.”