मुंबई, १६ एप्रिल, २०२०: कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्ये सहकार्य देत टाटा ट्रस्ट्स अत्यावश्यक वस्तू देशभरात उपयोगात आणता याव्यात यासाठी त्यांचे एअर लिफ्टिंग करत आहे. हे काम टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या सहयोगाने केले जात आहे.
आयात केल्या जात असलेल्या वस्तूंमध्ये व्यक्तिगत बचाव उपकरणांचे किट्स (संपूर्ण शरीर झाकले जाईल असे संरक्षक आवरण, मास्क्स, हातमोजे आणि गॉगल्स सहित) एन९५/केएन९५ मास्क्स आणि विविध ग्रेडस्चे सर्जिकल मास्क्स यांचा समावेश आहे. एका व्यक्तीसाठी एक युनिट अशाप्रकारच्या जवळपास एक कोटी युनिट्सचे कंसाइन्मेंट वेगवेगळ्या बॅचेसमध्ये आणले जाईल आणि येत्या आठवड्यांमध्ये देशभरातील सर्वाधिक गरजू भागांमध्ये त्यांचे वितरण केले जाईल. या साहित्याच्या सोर्सिंगसाठी बांधील ठेवण्यात आलेले एकूण मूल्य जवळपास १५० कोटी रुपये आहे.
चेअरमन श्री. रतन एन टाटा यांनी आपल्या निवेदनात नमूद केले होते की, आजवरच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक कोविड १९ विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन साधने तैनात करणे गरजेचे आहे. त्यानुसार टाटा ट्रस्ट्सने हे काम हाती घेतले आहे.